AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपर येथे सिलिंडर ब्लास्टचा धमाका, चार जण गंभीर जखमी

घाटकोपरच्या एका निर्माणाधीन इमारतीच्या शेजारी कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये सिलिंडर ब्लास्ट झाल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे.

घाटकोपर येथे सिलिंडर ब्लास्टचा धमाका, चार जण गंभीर जखमी
| Updated on: Sep 30, 2025 | 10:49 PM
Share

कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर येथील नीलधारा इमारत परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चौघा जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जखमी झालेल्या चौघांपैकी दोघे जण ६० ते ७० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

घाटकोपरमध्ये सिलिंडर ब्लास्ट

घाटकोपर पूर्वीकडील विद्यानिकेतन कॉलेजजवळ ६० फूट रस्ता, जैनमंदिराच्या समोर ‘नीलधारा’ या बांधकाम सुरु असलेल्या सात मजली इमारतीजवळ कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये मंगळवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की हा परिसर संपूर्णपणे हादरला. या स्फोटाने लागलेल्या आगीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चार जण गंभीर

या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत घनश्याम यादव ( ३६ ) तसेच देवेंद्र पाल ( २६ ) यांना ६० ते ७० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महेंद्र चौधरी ( ३२ ) यांना १० ते १२ टक्के भाजले आहे. तर संदीप पाल ( २० ) यांना ५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होत असताना घाटकोपरमध्ये अशी भयानक दुर्घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजावाडी दाखल केलेल्या जखमींची नावे

1) घनशाम यादव (36)

2)देवेंद्र पाल (26)

3) महेंद्र चौधरी (32)

4) संदीप पाल (20)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.