AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचा दुसरा विवाह मान्य नाही, मुलगी कायद्याने आव्हान देऊ शकते : न्यायालय

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या बैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. | Bombay high Court

वडिलांचा दुसरा विवाह मान्य नाही, मुलगी कायद्याने आव्हान देऊ शकते : न्यायालय
Bombay High Court
| Updated on: Mar 20, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या बैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high Court) दिलाय. मुंबईतील 66 वर्षीय महिलेला तशी नुकतीच परवानगी दिलीय. (Daughter Will Challenge Validilty Of Father second marriage Says Bombay high Court)

लग्नाशी संबंधित पती आणि पत्नीलाच विवाह वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार असतो, असं म्हणत मुंबईतील कुटुंब न्यायालयाने महिलेचा अर्ज फेटाळला होता. कुटुंब न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या बैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. आर. डी. धनुका आणि न्या.बिश्ट यांच्या खंडपीठाने म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार महिलेने याचिकेत म्हटलंय, माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी 2003 साली दुसरा विवाह केला. 2016 मध्ये वडिलांचं निधन झाल्यावर तिला वडिलांच्या दुसऱ्या विवाहाविषयी कळालं. पण दुसऱ्या आईचाही पूर्वी एका पुरुषाशी विवाह झाला होता तसंच त्याच्यासोबतची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने दुसरा विवाह केला होता. हीच सगळी परिस्थिती लक्षात घेता तिने वडिलांच्या विवाह वैधतेला कुटुंब न्यायालयात आव्हान दिलं.

विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार पती आणि पत्नी यांनाच असतो. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नसतो, असा युक्तीवाद दुसऱ्या आईने मांडला. कुटुंब न्यायालयाने तो युक्तीवाद ग्राह्य धरुन निर्णय दिला. त्याचविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं गेलं होतं.

न्यायालयाने काय म्हटलं?

तत्पूर्वी, याचिकेदार महिलेला आपल्या वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या आईच्या घटस्फोट प्रकरणाविषयी कळाले. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने (दुसऱ्या आईने) दुसरा विवाह केला होता. तक्रारदार महिलेने न्यायालयाच्या हीच गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा असल्याचं सांगत न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी घेऊन कायद्यानुसार योग्य तो निर्णय द्यावा, असे आदेश दिले आहेत.

(Daughter Will Challenge Validilty Of Father second marriage Says Bombay high Court)

हे ही वाचा :

VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

VIDEO | अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.