विकासाच्या योजना केवळ भाजपची मक्तेदारी आहे काय?; जेव्हा अजित पवार भडकतात…

राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. (development scheme is not bjp's monopoly says ajit pawar)

विकासाच्या योजना केवळ भाजपची मक्तेदारी आहे काय?; जेव्हा अजित पवार भडकतात...
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
भीमराव गवळी

|

Mar 08, 2021 | 5:47 PM

मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मागच्याच सरकारच्या योजनांची या सरकारने घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याचा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा अजितदादा भडकले. विकासाच्या योजना या केवळ भाजपची मक्तेदारी आहे काय? असा सवालच अजितदादांनी केला. (development scheme is not bjp’s monopoly says ajit pawar)

अजित पवार यांनी विधानभवनाच्या परिसरात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. पण विरोधकांनी तर त्या आमच्याच योजना आहेत असा दावा केल्याचं अजितदादांना विचारण्यात आलं. तेव्हा अजितदादांचा संतापाचा पारा चढला. आम्ही शेतकऱ्यांपासून महिलांच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजना काय भाजपची मक्तेदारी आहे का? त्या काय भाजपच्या योजना आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही काही साधूसंत नाही. पण जनतेला पटेल आणि रुचेल अशा योजना आम्ही दिल्या आहेत, असं ते म्हणाले.

पुणे, नाशिक, जालना हे मुंबईत आहेत काय?

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केल्याकडेही अजितदादांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर पुणे, नाशिक आणि जालना हे काय मुंबई महापालिकेत आहे का?, आम्ही ग्रामीण भागात दहा हजार कोटींचे रस्ते बांधणार आहोत, ते काय मुंबई पालिकेत येतात का?, प्राचीन मंदिरांचं जतन करण्यासाठी 101 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही प्राचीन मंदिरं मुंबईत येतात का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

इंधर दरवाढीवरून पोलखोल करणार

यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवरून विरोधकांची सभागृहात पोलखोल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील बॅरलचा दर काय होता आणि आता बॅरलचा दर काय आहे हे मी सभागृहात सांगणार आहे, असं सांगतानाच केंद्राने नको तेवढे टॅक्स वाढवून ठेवले आहेत. हे टॅक्स कमी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच उणे 8 टक्के जीडीपीचा दर असताना जेवढं काही सामावून घेता येईल, ज्यांना ज्यांना न्याय देता येईल त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच पायाभूत सुविधांवर मोठी तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

रोजगार निर्मिताला चालना देणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरु होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरु होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालये, नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५०० कोटी रूपये जाहीर केले आहेत. सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, अमरावती, परभणी येथे नविन वैद्यकीय माहविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असं पटोले यांनी सांगितलं. (development scheme is not bjp’s monopoly says ajit pawar)

संबंधित बातम्या:

भाजपला पुन्हा धक्का, दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Budget women : महिलांचे नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, 12 वीपर्यंत मुलींना मोफत प्रवास

Women’s Day 2021: सरकारची मोठी घोषणा! शगुन योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपये

(development scheme is not bjp’s monopoly says ajit pawar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें