AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti Manifesto 2024 Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना? फडणवीस यांचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं मोठं व्हिजन 

Devendra Fadnavis Bhavantar Yojana : भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस आहे. लाडक्या बहिणीपासून, तरुण ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक घोषणा आहे. पण या संकल्पपत्रात भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Mahayuti Manifesto 2024 Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना? फडणवीस यांचं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं मोठं व्हिजन 
शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना
| Updated on: Nov 10, 2024 | 11:30 AM
Share

भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस पाडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीरनाम्यात मोठी तरतूद करण्यात आली आहे. लाडक्या बहिणीपासून, तरुण ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक घोषणा आहे. पण या संकल्पपत्रात भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. काय आहे ही भावांतर योजना? तिचा काय होईल शेतकऱ्यांना फायदा?

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात काय काय असेल याचा उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा संकल्प करण्यात आला आहे. तर मोफत वीज देण्यासाठी अगोदरच पावलं टाकल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांकडून खरेदी झाली तर फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने याविषयीचा निर्णय घेतला होता. पण आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्या वर्षी करून दाखवल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे ज्या अन्नधान्यांची हमी भावाने खरेदी होईल. बाजारात त्यांना जर योग्य किंमत मिळाली नाही तर सरकार फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.

शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी तयार करणार

शेतकऱ्यांना मूल्य साखळी मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल हा प्रयत्न भाजपा करणार आहे. २०२७पर्यंत ५० लाख लखपती दिदी तयार करणार आहोत. स्किल सेन्सस करणार आहोत. शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र तयार करण्यात येणार आहे. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी १५ लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी, ईबीसी, ईडब्लूसी, एससी एसटी यांना शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती करणार आहोत. युवांमध्ये फिटनेस असावा म्हणून स्वामी विवेकानंतर फिटनेस कार्ड सुरू करू. गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्राधिकरण करणार आहोत, असे ते म्हणाले.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान