AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे आल्यावर देवेंद्र फडणवीस पाहा काय म्हणाले…

केंद्रीय निवडणुक आयोगाने अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाची मालकी सोपवण्याचा निर्णय दिला आहे. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे आल्यावर देवेंद्र फडणवीस पाहा काय म्हणाले...
| Updated on: Feb 06, 2024 | 9:26 PM
Share

मुंबई : राज्यात निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देताना राष्ट्रवादी पक्षाची मालकी अजित पवारांना दिली. या ऐतिहासिक निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यभर अजित पवार गटाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. शरद पवार गटाकडून हे षडयंत्र असल्याने हाच निकाल अपेक्षित होता अशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत. या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनीही आपली प्रतिक्रिया देताना अजित पवार याचं अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. अजित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी करत (एक्स) ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. या निकालावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, असं निकालानंतर अजित पवार म्हणाले आहेत. मात्र या निकालानंतर शरद पवार गटाकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंतं थांबणारही नाही आणि झुकणारही नाही, असं शरद पवार व्हिडीओमध्ये बोलत आहेत. त्यासोबतच या निकालानंतर राष्ट्रवादीकडून एक मोहिम राबवण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

रोहित पवारांची प्रतिक्रिया

केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मुंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं. असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत असल्याचं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यावर आता शरद पवार यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.