Dhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ

धनंजय मुंडे यांची विधानसभेतील आणि विधान भवनाबाहेरील भाषणेही चांगलीच गाजत असतात. मात्र आज बोलता बोलता सुरूवातील धनंजय मुंडेंचा थोडा घोळ झाला. मात्र मोठ्या लगबगीनं धनंजय मुंडेंनी ती चूक सावरूनही घेतली.

Dhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले...म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ
धनुभाऊ चुकून चुकले...म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jul 03, 2022 | 4:46 PM

मुंबई : मोठ्या राजकीय वादावादीनंतर आज राज्याच्या विधानसभेला बऱ्याच महिन्यांनी नवे विधनसभा अध्यक्ष (Assembly Speaker) मिळाले आहेत. आधी विधानसभा अध्यक्ष आमचाच म्हणता म्हणता शेवटी बहुमताच्या जोरावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बाजी मारली. शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजपच्या मतांच्या जोरावर राहुल नार्वेकरांनी राजन साळवी यांचा मोठ्या मतांच्या फरकाने परभव केला. त्यानंतर आपली राजकीय परंपरा म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावाची भाषण सुरू झाली. यावेळी अजित दादा, सुधीर मुनगंटीवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांची भाषण पुन्हा तुफान गाजली. मात्र यावेळी अजून एक भाषण चर्चेत राहिलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे यांची विधानसभेतील आणि विधान भवनाबाहेरील भाषणेही चांगलीच गाजत असतात. मात्र आज बोलता बोलता सुरूवातील धनंजय मुंडेंचा थोडा घोळ झाला. मात्र मोठ्या लगबगीनं धनंजय मुंडेंनी ती चूक सावरूनही घेतली.

भाषणावेळी नेमकं काय घडलं?

राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बोलायला उभे राहिले. मात्र त्यांनी पहिलच वाक्य उच्चरलं आणि समोरच्या बाकावरचे सदस्य ओरडायला लागले. सन्मानीय मिलींद नार्वेकर साहेबांच्या… एवढंच बोलले तोवर समोरच्या बाकावरच्या सदस्यांनी राहुल राहुल..असे आवाज करत विधानसभा अध्यक्ष हे मिलिंद नार्वेकर झाले नाहीत तर राहुल नार्वेकर झाले आहेत. हे धनंजय मुंडेंच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही सावरून घेतलं आणि म्हणाले, माझे मित्र राहुलजी नार्वेकरांच्या अभिनंदन प्रस्तावावर याठिकाणी बोलयला उभा आहे. तेवढ्यात इतर सदस्यांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाका अशी मागणी केली. तर हे काढून टाकण्यात येईल असे अध्यक्षांनीही तात्काळ सांगितले.

पाहा तो व्हिडिओ

धनंजय मुंडेंनी कसं सावरलं?

आता विधानसभा अध्यक्षांच्या नावातच गफलत झाली आहे हे लक्षात आल्यावर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीची काहणी सांगत सावरून घेतलं. ते म्हणाले, माझी आणि आदित्यजीची सकाळी लिफ्टमध्ये भेट झाली. याला कारण आणि संदर्भही तसा आहे. मी आपण मुख्यमंत्री झाल्यावर आपलं अभिनंदन करयाला आपल्याकडे आलो. त्याचदरम्यान मिलिंदजीही गेले होते असं आदित्य यांनीही सांगितलं. कोण पुढच्या दाराने गेलं, कोण मागच्या दाराने गेलं म्हणून तेच लक्षात राहिलं असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. मग प्रकरण सावरलं गेलं आणि धनंजय मुंडे यांचं अभिनंदनाचे भाषण सुरू झालं.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें