Anil Parab : रामदास कदम यांचं स्विस बँकेत अकाऊंट आहे का? पोरी नाचवून भाड खाणाऱ्यांना…अनिल परब यांचा जोरदार हल्ला
Anil Parab on Kadam Swiss Bank : रामदास कदम यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. तर येत्या अधिवेशनात पुराव्यानिशी अनेक प्रकरणं समोर आणण्याचा इशारा दिला.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दसरा मेळाव्यात त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली तर काल शरद पवार यांचा दाखला देत त्यांनी आरोपांची मालिका थांबवली नसल्याचे दिसले. त्याविरोधात आज उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांनी कदम पित्रा-पुत्राविरोधात खळबळजनक आरोप केले. त्यांनी येत्या अधिवेशनात पुराव्यानिशी अनेक प्रकरणं समोर आणण्याचा इशाराही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.
हाताचे मोल्ड आणि ठशातील फरक कळतो का?
बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांच्या हाताचे मोड्ल बनवले होते. हे मोल्ड कुठे ठेवले होते माहीत आहे का. सहाराचं स्टेडियम झालं, तिथे ते बनवले होते. बाळासाहेबांच्या हयातीतच. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत बनवले होते. हा मोल्ड आहे. याला ठसे म्हणत नाहीत. हा पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम यांचं शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठश्यातील. बाळासाहेब गेल्यावर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कोणते ठसे घेतले. त्याचा कोणता वापर होतो, हे कदम यांना माहिती आहे का, अशी टीका परब यांनी कदमांवर केली.
कदमांचं स्विस बँकेत खातं आहे का?
स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहीत आहे का. रामदास कदमचं अकाऊंट आहे का तिकडे. अशा प्रकारे ठसे घेऊन स्विस बँकेतून पैसे येतात? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे. त्यांची संपत्ती काय होती हे माझ्यापेक्षा कुणाला माहीत नाही, असा टोला अनिल परब यांनी रामदासभाईंना लगावला.
योगेश कदमांवर टीका
तर पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू नाही. तो भाडखाऊन पैसा कमावतो. दलाली करून पैसा कमावतो. आम्ही कोर्टावर सोपवू. कोर्ट त्याला शिक्षा करेल. जे लोक दलालीचे पैसे खातात आम्ही त्याच्याकडून पैशाची अपेक्षा नाही. कोर्टाचं त्यांना दंड ठोठावलं आहे. पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातो त्याला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे. गृहराज्य मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतो. नैतिक लाज असली पाहिजे. ज्या बारवर वांरवार रेड होते. तरीही सुधारत नाही. यांना भाडगिरीची सवय लागली आहे, अशी त्यांच्यावर जहरी टीका केली.
नितेश राणेंवर घणाघात
नितेश राणेंनी स्वित्झर्लंडवरून कोण येणार होते त्याची माहिती द्यावी. त्यांचे नातेवाईक येणार होते का. ज्यांना माहीत आहे. त्यांनी कोर्टात जावं. त्यांनी कागदी बाण उडवण्यापेक्षा कोर्टात प्रतिज्ञापत्रात मांडावं. बाळासाहेबांच्या मृत्यूवर कुणाला शंका असेल तर त्यांनी कोर्टात जावं ना. नितेश राणेंनी कोर्टात जावं, असे अनिल परब म्हणाले.
