AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीतील ‘सूटकेस मृतदेहा’चं गूढ उकललं, समलिंगी संबंधातून हत्या

आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. त्यानंतर झालेल्या वादातूनच प्रफुल्लने उमेशची हत्या केली

डोंबिवलीतील 'सूटकेस मृतदेहा'चं गूढ उकललं, समलिंगी संबंधातून हत्या
मयत उमेश पाटील
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 07, 2020 | 11:09 AM
Share

डोंबिवली : डोंबिवलीत सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना अवघ्या नऊ तासांत यश (Dombivali Gay Murder Mystery Solved) आलं आहे. 53 वर्षीय उमेश पाटील यांची समलिंगी संबंधातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. आरोपी प्रफुल्ल पवार याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली.

आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.

काही दिवसांपूर्वी आरोपी प्रफुल्ल पवार याचा विवाह झाला. प्रफुल्लच्या लग्नानंतरही उमेश त्याच्याकडे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र प्रफुल्लने नकार दिल्यामुळे ‘तुझ्या बायकोला सगळं सांगेन’ अशी धमकी तो देत होता.

प्रफुल्ल आणि उमेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधांवरुन बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं. उमेशच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून प्रफुल्लने त्याची गळा आवळून हत्या केली.

पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरला. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरात झुडूपात टाकला होता. त्यानंतर बॅगेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली (Dombivali Gay Murder Mystery Solved) होती.

Follow Us
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध