Mumbai Temperature | मुंबईत मोठे वातावरणीय बदल, 27 वर्षात तापमान 2 अंशांनी वाढलं

एका अभ्यासामध्ये तर मागील 27 वर्षात मुंबईचे तापमान चक्क दोन अंशांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे मुंबईतील वातावरणीय बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

Mumbai Temperature | मुंबईत मोठे वातावरणीय बदल, 27 वर्षात तापमान 2 अंशांनी वाढलं
mumbai temperature
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 12:00 AM

मुंबई : आकाशात जाणाऱ्या इमारती, धूर ओकणाऱ्या गाड्या असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे. निसर्गाशी छेडछाड केल्यामुळे येथील वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. एका अभ्यासामध्ये तर मागील 27 वर्षात मुंबईचे तापमान चक्क दोन अंशांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे मुंबईतील वातावरणीय बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

मुंबईतील वातावरण बदलावर धक्कादायक निष्कर्ष

नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबाद मधील उस्मानिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांनी एक अहवाल दिला आहे. या अहवालात मुंबईतील वातावरण बदलावर धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. निष्कर्ष मांडण्यासाठी संशोधकांनी उपग्रहांची मदत घेतली आहे. त्यांनी मुंबई तसेच उपनगरांचा अभ्यास केलाय.

मुंबईचे सरासरी तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले

या अभ्यासामध्ये मुंबईने 1991 ते 2018 या काळात 40 टक्के जंगल आणि झुडपे असलेली जमीन, तब्बल 81 टक्के मोकळी जागा तसेच 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे मुंबईतील वातावरणात मोठा बदल झालाय. फक्त सत्तावीस वर्षात मुंबईचे सरासरी तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. तशी माहिती या संशोधनात देण्यात आली आहे. या संशोधनात मुंबई तसेच उपनगरातील 603 चौरस किलोमिटरचा अभ्यास करण्यात आला आहे.

बांधकाम क्षेत्रात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ

मुंबईतील वातावरणीय बदल तसेच तापमानवाढीला फक्त हवामान बदल कारणीभूत नाहीये. तर अमर्याद वाढलेले बांधकामसुद्धा वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरले आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इतर बातम्या :

ऊस परिषदेत राजू शेट्टींचा एल्गार, ऊस एफआरपीच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल

Amarinder Singh New Party | मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता

SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल

(due to construction and environment change in 27 years mumbai temperature increased by 2 degree celsius)

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.