AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amarinder Singh New Party | मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता

पंजाबमधील काँग्रेसचे बडे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग अखेर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. नव्या पक्षाची भूमिका तसेच नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सिंग यांचा नवा पक्ष पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत.

Amarinder Singh New Party |  मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता
Amarinder-Singh
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 11:25 PM
Share

चंदीगड : पंजाबमधील काँग्रेसचे बडे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग अखेर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. नव्या पक्षाची भूमिका आणि तसेच नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सिंग यांचा नवा पक्ष पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत. अमरिंदर सिंग यांच्या या भूमिकेमुळे पंजाबच्या राजकारणात नवी समीकरणं उदयाला येण्याची शक्यता आहे.

नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता 

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीमाना देण्याचे आदेश दिले. तसेच चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला. याच कारणामुळे मागील अनेक दिवसांपासून अमरिंदर सिंग नाराज होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी आता भापजमध्ये थेट प्रवेश न करता नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच पक्षस्थापनेनंतर ते भाजपशी युती करण्याची शक्यता करतील असे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपने तोडगा काढला तरच युती

त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची भूमिका काय असेल तसेच पक्षाचे नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपने तोडगा काढला तरच भाजपशी युती करु असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे सिंग यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे.

मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे कॅप्टन नाराज 

दरम्यान, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसवर तसेच काँग्रेस नेतृत्वार प्रचंड नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी यापूर्वी उघडपणे बोलून दाखवलेली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं, असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.

इतर बातम्या :

मुरादाबादमध्ये डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कागदावर 200 वेळा लिहिले ‘हे’ 3 शब्द

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय, 40 टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंकाचा नारा, लडकी हुँ लड सकती हुँ !

अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच एव्हिएशन ब्रिगेड तैनात, आता सीमा पार करण्याची चीनची बिशाद काय!

(former punjab chief minister Captain Amarinder singh congress going to form new party soon may form alliance with BJP)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.