AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या बेस्ट उपक्रमात दाखल होणारी प्रत्येक बस इलेक्ट्रिक असेल, 2028 पर्यंत बसताफा इलेक्ट्रिक होणार : आदित्य ठाकरे

2028 पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसेस या इलेक्ट्रिक असतील, असे उद्गार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत.

मुंबईच्या बेस्ट उपक्रमात दाखल होणारी प्रत्येक बस इलेक्ट्रिक असेल, 2028 पर्यंत बसताफा इलेक्ट्रिक होणार : आदित्य ठाकरे
Aditya Thackeray - Kishori Pednekar
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 6:17 PM
Share

मुंबई : 2028 पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसेस या विद्युत ऊर्जेवर धावतील, अर्थात मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या केवळ इलेक्ट्रिक बस धावतील. असे उद्गार राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. (Every BEST bus running on Mumbai roads will be electric : Aditya Thackeray)

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टिने मुंबई वातावरण कृती आराखडा बनवण्याची कार्यवाही वेगाने सुरु आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे तीन नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहेत. वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन असे हे तीन उपक्रम असून या तीनही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर महानगरपालिका मुख्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अध्यक्षस्थानावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बोलत होते

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणाचे भान राखून त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी याआधीच निरनिराळ्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरी वनीकरणाचा भाग म्हणून गत दीड वर्षभरात लावलेली सुमारे अडीच लाख झाडे असे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. त्यापुढे जाऊन आता पर्जन्य जल संवर्धन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये परिसर व शक्य तिथे शोष खड्डे करुन त्यात पाणी मुरवले पाहिजे. वाहतूक बेटं, उड्डाण पुलांखालील जागा, मैदानांभोवती कुंपण स्वरुपात याप्रमाणे झाडांची लागवड केली पाहिजे. वातावरण बदल तीव्र होत असून त्याचा सामना सर्वच देशांना करावा लागतो आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून शाश्वत विकासासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. वातावरण बदल सक्षमतेसाठी चळवळ उभी करताना त्यात महिलांचे नेतृत्व उभे करण्यासाठी देखील आपण आज करार केला, ही समाधानाची बाब आहे.

2028 पर्यंत संपूर्ण बेस्ट बसताफा इलेक्ट्रिक

मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रिक असेल. 2028 पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा हा इलेक्ट्रिक असेल, असा मानस व्यक्त करुन बेस्टच्या डबल डेकर बसेस या इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन फ्युएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल, त्या ऊर्जेआधारे धावताना दिसतील, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

सामंजस्य करारांमुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्र एकत्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी होत आहे. आजच्या सामंजस्य करारांमुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्राला एकत्र आणण्याचे काम झाले आहे. पर्यावरण खात्याला लोकाभिमुख चेहरा देण्याची मोलाची कामगिरी आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. पर्यावरण रक्षणामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेला करार हा महिला नेतृत्वाला अधिक वाव देणारा ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. मुंबईसह महाराष्ट्र प्रदूषणविरहीत झाले तर त्यातून देशाला उत्कृष्ट प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

2025 पर्यंत 50 टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक वाहनांमधून

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मनोगतात नमूद केले की, खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत संस्थांसमवेत सामंजस्य करार केल्याने, जगभरात जे सर्वोत्कृष्ट कार्य अशा संस्थांद्वारे होते, ते तंत्रज्ञान, अनुभव महानगरपालिका प्रशासनाला मिळू शकणार आहे. शासनाने 2023 पर्यंत 15 टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक वाहन आधारित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याहीपुढे जाऊन महानगरपालिकेने 2025 पर्यंत 50 टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रिक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

55 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणार

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा म्हणाले की, राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला अनुसरुन बेस्ट उपक्रमाची वाटचाल सुरु आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये यापुढे इलेक्ट्रिक वाहनेच समाविष्ट केली जातील. महानगरामध्ये इलेक्ट्रिक वाहने विद्युत भारित (चार्ज) करण्यासाठी सुमारे 55 ठिकाणे निवडली आहेत. तेथे खासगी-सार्वजनिक भागीदारीतून येत्या 3 ते 4 महिन्यात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. यामुळे सर्वसामान्य जनतेलाही वाहने चार्ज करण्याची सुविधा मिळेल. जनतेला शाश्वत, किफायतशीर, उत्कृष्ट आणि सर्व परिसरांना जोडणारी अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा बेस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आमूलाग्र बदल होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Every BEST bus running on Mumbai roads will be electric : Aditya Thackeray)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.