AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED Arrest : आधी पत्नीची ईडी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत, आता थेट आमदार सरनाईकांच्या निकटवर्तीय व्यावसायिकाला अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला अटक केलीय.

ED Arrest : आधी पत्नीची ईडी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत, आता थेट आमदार सरनाईकांच्या निकटवर्तीय व्यावसायिकाला अटक
अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स
| Updated on: Apr 07, 2021 | 12:26 AM
Share

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला अटक केलीय. ईडीकडून अटक करण्यात आलेल्या या व्यावसायिकाचं नाव योगेश देशमुख असं आहे. 17 मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. यावेळी योगेश देशमुख यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती (ED arrest businessman Yogesh Deshmukh close friend of Shivsena MLA Pratap Sarnaik).

आता NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात योगेश देशमुख यांना अटक झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे 17 मार्चला योगेश देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ईडीची सरनाईकांच्या घर, कार्यालयावर छापेमारी

दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

ईडी सांगेल तेव्हा चौकशीला जाईल

मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले होते.

भाजप विरुद्ध आघाडी लढाई

ही लढाई भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भाजपच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार पाच नव्हे 25 वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.

जे होईल ते योग्यच होईल: विहंग

विहंग सरनाईक यांनीही मीडियाशी संवाद साधला होता. जे होईल ते योग्यच होईल. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया विहंग यांनी व्यक्त केली होती. माझी पत्नी आजारी असल्याने मी ईडीच्या चौकशीला जाऊ शकलो नाही. मी ईडीला पत्रं लिहून कळवलं होतं. पण तरीही नोटिसा पाठवत राहिले. त्यांनी समन्स बजावले आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असं सांगतानाच काय बरोबर आणि काय चूक हे लोकांनीच ठरवावं असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा :

ED, CBI आणि आयकर विभागाला सरकार आपल्या बोटांवर नाचवतं, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण

व्हिडीओ पाहा :

ED arrest businessman Yogesh Deshmukh close friend of Shivsena MLA Pratap Sarnaik

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.