AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आपका एक घंटा 13 मिनिट का भाषण मैने सुना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीत एकनाथ शिंदेंना काय सांगितलं?

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या समर्थकांना मुंबईत आणले होते.

Eknath Shinde : आपका एक घंटा 13 मिनिट का भाषण मैने सुना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीत एकनाथ शिंदेंना काय सांगितलं?
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सत्कारानंतर बोलताना एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
| Updated on: Jul 15, 2022 | 5:09 PM
Share

मुंबई : राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. माझे एक तास 13 मिनिटांचे भाषण त्यांनी ऐकले. तुम्ही मनातून बोललात, असे मोदी म्हणाले. ही फार मोठी माणसे देशाचे नाव जगात पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याबद्दलही हे रोज बोलत आहेत. प्रत्येकाला वाटले पाहिजे, की हे माझे सरकार आहे, त्यासाठी आम्ही कष्ट करू, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या समर्थकांना मुंबईत आणले होते. या कार्यक्रमात शिंदेंनी फटकेबाजी केली. कोणाचेही नाव न घेता संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे सामान्यांचे सरकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

‘लोकांनी स्वीकारली भूमिका’

मी घेतलेली भूमिका ही लोकांनी स्वीकारली आहे. माझ्यासोबत 8 मंत्री आहेत. सत्तेतील लोक बाहेर पडले. एक दोन नाही 50 जण बाहेर पडले. अनेकांनी सांगितले, की आम्ही हे देतो, ते देतो, मी म्हटले की आम्ही काही मिळवायला आलोच नाहीच. भाजपाविषयीही वाईट मत तयार केले. आमदारांचे खच्चीकरण होत आहे. त्यांची भावना पोहोचवण्यासाठी आलो आहे, मुख्यमंत्रीपदासाठी आलेलो नाही. मी चार पाच वेळा सांगितले, की आमदारांची भूमिका समजून घ्या. पण ऐकले नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिवसेना, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.

‘शिवसैनिकांच्या पदरात काय पडले?’

ग्रामीण भागात शिवसैनिक कसे पक्ष वाढवतायेत, याकडे कुणी लक्ष दिले? मी नगरविकासातून निधी देत होतो, तेही अनेकांना पचले नाही. अडीच वर्षांत शिवसैनिकांच्या पदरात काय पडले. सत्ता असताना चार नंबरला गेला पक्ष. काही शिवसैनिकांना खोट्या केसेसना सामोरे जावे लागले. काही जणांना मोक्का लागला. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख रडू लागले, असे शिंदे म्हणाले.

‘खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही’

भाजपाबाबत गैरसमज होता, सीएमपदाच्या खुर्चीसाठी काहीही करतात, असे सांगू लागले. पंतप्रधान, गृहमंत्री, अध्यक्ष, देवेंद्रजी यांनी सीएमपदाची खुर्ची दिली. त्यांचे आभार मी मानले आहेत. मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही 50 जण मुख्यमंत्री आहात. आता प्रत्येक शिवसैनिकाला वाटत आहे, की तो मुख्यमंत्री आहे. तो त्याची गाऱ्हाणी सांगत आहे. तुमच्या हक्काचा माणूस सहाव्या मजल्यावर आहे. खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी बंडखोर आमदारांना दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.