Nawab Malik Charge sheet: नवाब मलिकांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्रं दाखल, 5 हजार पानांचं दस्ताऐवज, पेटीतून कोर्टात

हे आरोपत्र ईडीकडून दाखल करण्यात आले असून मलिकांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून आता येणारा काळच त्यांना कधी जामीन मंजूर होणार हे पाहावे लागणार आहे.

Nawab Malik Charge sheet: नवाब मलिकांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्रं दाखल, 5 हजार पानांचं दस्ताऐवज, पेटीतून कोर्टात
नवाब मलिक यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल; मलिकांची डोकेदुखी वाढणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 5:11 PM

मुंबईः मनी लाँडरिंग (Money Laundering) आणि डी कनेक्शनच्या (D-connection) आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे 5000 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात आता आणखी डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र आता पुन्हा ईडीकडून पाच हजार पानांचं दस्ताऐवजासह आरोप पत्र दाखल केले गेल्याने आता मलिकांची चिंता वाढणार असून विरोधकांना आता आणखी एक मुद्दा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

न्यायालयीन कोठडी वाढणार का?

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या संबंधित कुटुंबीयांच्या मालमत्तांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढही करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीही वाढवण्यात आली होती.

ईडीकडून पुन्हा 5 हजार पानांचं आरोप पत्र

आता पुन्हा नवाब मलिकांबाबत ईडीकडून पुन्हा 5 हजार पानांचं आरोप पत्र दाखल केले गेले असल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीच्या निर्णयात काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. न्यायालयीन कोठडीत असणारे मलिक सध्या वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या पायाला सूज येणे आणि किडनीचा त्रास होणे हा त्रासही त्यांना होत आहे मात्र त्यावर औषधोपचार केला जात असला तरी त्याच्यावर कायमस्वरुपी उपाय करण्याची मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Aurangabad | तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना

लाऊडस्पीकरचा वाद पोहोचला सुप्रीम कोर्टात, राज ठाकरेनंतर हिंदू महासभेची देखील अजानवर हरकत, म्हणाले अजानवर बंदी घाला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.