सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार

सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलामान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार करण्यात आली आहे. सलमानने मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान खान काल संध्याकाळी डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता. त्यावेळी एक व्यक्ती त्याचा व्हिडीओ शूट करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती जवळपास 20 मिनिटे सलमानचा व्हिडीओ बनवत राहिल्याने सलमानला राग आला.  रागाच्या भरात सलमानने त्या व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने खेचून घेतला. त्याचबरोबर सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

यामुळे संबंधित व्यक्तीने सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात डी एन नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या 

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सलमान खान 

लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल, सलमानच्या जागी कोण?   

करो मतदान…मोदींच्या आवाहनानंतर शाहरुखचा खास व्हिडीओ   

VIDEO : ‘झुम्मे की रात’ वर सलमानसोबत व्यंकटेशचा हटके डान्स 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI