बायकोच्या प्रियकराकडून हत्या, मुंबईतील खळबळजनक घटना

मुंबई : अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आला. दोघांमध्ये झालेल्या भांडणावरुन मित्रानेच आपल्या जवळच्या मित्राचा चाकू भोसकून खून केला. या घटनेमुळे वडाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इब्राहिम रफिक असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी इरफान ख्वाजा याला अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत. वडाळा परिसरातल्या अँटॉप हिल विभागात […]

बायकोच्या प्रियकराकडून हत्या, मुंबईतील खळबळजनक घटना
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आला. दोघांमध्ये झालेल्या भांडणावरुन मित्रानेच आपल्या जवळच्या मित्राचा चाकू भोसकून खून केला. या घटनेमुळे वडाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इब्राहिम रफिक असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी इरफान ख्वाजा याला अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत.

वडाळा परिसरातल्या अँटॉप हिल विभागात इब्राहिम आणि त्याची पत्नी राहत होते. इब्राहिमचा मित्र इरफान या दोघांची चांगली मैत्री होती. पण याच मैत्रीमुळे इब्राहिमची पत्नी आणि इरफान यांच्यात अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ही गोष्ट इब्राहिमला समजली तशी दोघांमध्ये भांडणं होऊ लागली आणि यातूनच रागाच्या भरात इरफानने इब्राहिमचा काटा काढला.

मुंबईमध्ये  29 एप्रिलला लोकसभा निवडणुकांची धावपळ होती. सगळेजण मतदान करण्याच्या घाईत होते. पण वडाळा परिसरात एक मृतदेह सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनतर तपासाला सुरुवात झाली. या तपासात अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे मित्रानेच आपल्या मित्राच्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

या खूनप्रकरणात अधिक चौकशी करताच इब्राहिम आणि त्याचा मित्र इरफान यांची वारंवार भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार इरफानला पोलिसांनी अवघ्या तासाभरात ताब्यात घेतलं. इरफान मुंबईबाहेर पळून जाण्याचा तयारीत होता. मात्र त्याचा डाव फसला आणि या खुनाचा उलगडा झाला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें