AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता व्हा उद्योजक! मराठा तरुणांना फडणवीस सरकारकडून मोठे गिफ्ट, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, तर…

Annasaheb Patil Economically Backward Development Corporation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी फडणवीस सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

आता व्हा उद्योजक! मराठा तरुणांना फडणवीस सरकारकडून मोठे गिफ्ट, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, तर...
देवेंद्र फडणवीस, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 9:59 AM
Share

Annasaheb Patil Economically Backward Development Corporation: मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आनंदवार्ता दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी ही मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होईल.

अर्थसंकल्पात 750 कोटींची तरतूद

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विविध योजना राबवते. त्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात फडणवीस सरकारने 750 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्यापैकी 300 कोटींचा निधी वर्गही करण्यात आला होता. त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला होता. आता नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

150 कोटींचा निधी

आता नियोजन विभागाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा खर्च करताना कोणतीही अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 29 ऑगस्ट 1998 रोजी करण्यात आली होती. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के आणि 50 टक्के अशा प्रकारे निधी वितरीत करण्यात येतो. हा निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्या जाते. त्यानंतर पुढील निधीची तरतूद करण्यात येते. स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला गती देणाऱ्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवते. त्यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात येतो. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2017 मध्ये वाढवून 6 लाख आणि पुढे 8 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

शासन निर्णय इथं वाचा :     Annasaheb Patil Economically Backward Development Corporation

मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 30 मे 2026 रोजीपासून हे उपोषण करण्यात येणार आहे. याविषयीची बैठक अंतरवाली सराटीत झाली आणि नंतर त्यांनी हा इशारा दिला. सरकार आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींच्या निधीची अपडेट दिली आहे.

Follow Us
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!