AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचं विधान भांडणं लावण्याचं, व्यापाऱ्यांकडूनही राज्यपालांच्या त्या विधानाचं समर्थन नाही

हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं.

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचं विधान भांडणं लावण्याचं, व्यापाऱ्यांकडूनही राज्यपालांच्या त्या विधानाचं समर्थन नाही
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 30, 2022 | 3:13 PM
Share

मुंबई : राज्यात आजपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या एवढी कोणत्याही राज्यपालांची चर्चा झाली नसेल, तसेच वादही झाले नसतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळातला (Uddhav Thackeray) राज्यपाल विरुद्ध सरकार हा संघर्ष संबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतचं राज्यपालांचे विधान आणि त्यानंतर भडकलेले राज ठाकरेही (Raj Thackeray) पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी पुन्हा राज्यपालांनी एक मोठं विधान केलं आणि संतापाचा डोंब उसळला. मुंबईतून गुजरात आणि राजस्थानी काढले तर मुंबईत काहीच पैसा उरणार नाही. मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं. मात्र याबाबत आता मुंबईतल्या व्यापाऱ्यांनीही राज्यपालांचे विधान हे केवळ भांडण लावण्याकरता आहे, असे म्हणत त्याला विरोध दर्शवला आहे.

राज्यपालांच्या विधानाला व्यापाऱ्यांचाही विरोध

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी व्यापारी वर्तुळाने राज्यपालांच्या विधानाला विरोध केला आहे. बोरिवलीच्या राजस्थानी आणि गुजराती व्यापारी मंडळांनी राज्यपालांच्या विधानाला भांडणाचे विधान म्हटले आहे. मुंबईची आर्थिक राजधानी सर्वांच्या सहकार्याने बनली आहे, त्यामुळे कुणी बाहेर गेलं तर काही फरक पडेल, असे राज्यपालांचे विधान चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

राज्यपलांच्या विधानावर भाजपची भूमिका काय?

आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याच समर्थन करत नाही. ते त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते पण आम्ही याला समर्थन देऊ शकत नाही. अनेक हुतात्म्यांने बलिदानाने ही मुंबई उभी राहिलीय. आणि ही संपूर्ण भाजपची भूमिका आहे आमचे सगळेच नेते सांगत आहेत की हे समर्थनीय नाही. अशी प्रतिक्रिया यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

राज्यपलांविरोधात राज्यभर आंदोलनं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्याने राज्यभर निषेध करण्यात येतो आहे. आज उस्मानाबाद येथे शिवसेना पदाधिकारी यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले यावेळी राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.