अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा, कुठे हरवलेत अण्णा?; संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut on Anna Hazare : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित दारु घोटाळ्यात अटक केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे अशावेळी कुठे आहेत. ते कुठे हरवले आहेत, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला.

अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा, कुठे हरवलेत अण्णा?; संजय राऊत यांचा सवाल
अण्णा हजारे कुठे हरवलेत? संजय राऊतांचा टोलाImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 11:41 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. कथित दारु घोटाळ्याप्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया येत आहेत . राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडेही मोर्चा वळवला. अण्णा हजारे अशावेळी कुठे आहेत, ते कुठे हरवले आहेत, असा खोचक सवाल त्यांनी केला. 11 वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले असता. त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल पण होते. त्यानंतर त्यांनी राजकीय वाट चोखंदळली. गेले तीन टर्म ते दिल्लीच्या सत्तास्थानी आहेत.

अटक राजकीय सूडबुद्धीने

केजरीवाल राजकारणात आले आणि त्यांनी मोठी पार्टी तयार केली. पंजाब, दिल्लीच नाहीतर संपूर्ण देशात त्यांची पार्टी आहे.त्यांनी अण्णा हजारे बरोबर भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली आणि आज त्याची पार्टी वाढत आहे. भाजपला भीती आहे. आप इंडिया गट बंधनचा एक भाग आहे.हा घोटाळा फक्त कागदावरच आहे. तरीही त्यांना अटक करण्यात आली.  तानाशाही राज्यात अशी कारवाई होत आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होते. केजरीवाल बरोबर आहेत. अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे. ही बेकायदेशीर अटक आहे, असे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नेते तुरुंगात टाकण्याचा सपाटा

मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती आहे, त्यांना अटक करण्यात येत आहे. येऊ शकते. त्यांना निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते तुरुंगात टाकत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा भाजप यांच्याकडे शेकलेला आहे. खंडणीच्या  माध्यमातून ,दहशतीच्या माध्यमातून हप्ता गोळा केल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांना अगोदर जागं करा

अण्णा हजारे यांना पहिले जागा करा, कुठे आहेत ते? मला माहित नाही. कुठे असतात ते एकेकाळी त्यांचे आंदोलन होते एकीकडे अशा विषयांवर. आता कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही, असा टोला ही त्यांनी यावेळी हाणला.

आम्हाला वारसा शिकवू नका

हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हे भारतीय जनता पक्षाने सांगण्यात इतके आम्ही खाली घसरलो नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी हिंदूहृदय सम्राट पक्षप्रमुख यांचा पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न बघतात त्यांच्याकडून वारसा हे काय आम्ही शिकायचं? शरद पवार हायात असताना त्यांचा वारस सुप्रिया सुळे नाही असं भाजप म्हणत आहे, तर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप ज्या मोदींनी केले ते अजित पवार आहे. ही भारतीय जनता पक्षाची अक्कल आहे .तिथे ती अक्कल नाही म्हणून अशा प्रकारचे विधान ते करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.