AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 11:45 AM
Share

मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता

राजेश टोपे म्हणाले, “कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांशी झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.”

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, “आरोग्य विभागाशी संबंधित जरी थेट हा विषय नसला तरी आयटी विभागाने दाखवलेल्या असमर्थतेमुळे ही वेळ आली. पण परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणार, परीक्षा लांबणीवर पडली आहे, न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली, या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार आहेत”

परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे?, फडणवीसांची कडाडून टीका

आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही, प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं, सगळंच कन्फ्युजन आहे. काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत. या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केले.

या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला. या प्रकरणाची १०० टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला. हा दलालीचा नवा अध्याय सुरु झालाय, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा :

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.