LIVE : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार

मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनचा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा यांसह सखल भागात पाणी साचलं आहे येत्या 24 तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे.

LIVE :  महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 4:32 PM

मुंबई : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनचा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा यांसह सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही उशीराने धावत आहे. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

LIVE  UPDATE

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार” date=”27/07/2019,3:25PM” class=”svt-cd-green” ] पावसामुळे अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी कल्याण ते कोल्हापूर दरम्यान एक विशेष ट्रेन धावणार, मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी घाबरु नका : मुख्यमंत्री” date=”27/07/2019,1:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता” date=”27/07/2019,1:42PM” class=”svt-cd-green” ] रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता, अशी माहिती वेध शाळेने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बदलापूरात दाखल” date=”27/07/2019,1:41PM” class=”svt-cd-green” ] ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बदलापूर महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे दाखल [/svt-event]

[svt-event title=”कल्याण पेट्रोल पंप पाण्याखाली” date=”27/07/2019,1:39PM” class=”svt-cd-green” ] कल्याण येथील पेट्रोल पंप पाण्याखाली गेले आहे. पेट्रलो पंपावर 100 लोक अडकले [/svt-event]

[svt-event title=”शांतीसागर रिसॉर्टमध्ये 40 लोक अडकले” date=”27/07/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथच्या शांतीसागर रिसॉर्टमध्ये 40 लोक अडकले आहेत. येथील लोकांनी प्रशासनाला व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी हाक दिली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 500 प्रवाशांना बाहरे काढण्यात यश” date=”27/07/2019,12:33PM” class=”svt-cd-green” ] महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 500 प्रवाशांना बाहेर काढण्यात NDRF टीमला यश आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे विलेपार्ले पूर्व भागात गेल्या 12 तासांत 22 झाडे पडली.” date=”27/07/2019,12:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” कल्याणमधील वालधुनी परिसरात घर बुडाले” date=”27/07/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 150 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश” date=”27/07/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहरे काढण्यासाठी NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 150 जणांची सुटका करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी NDRF टीमचे बचावकार्य सुरु” date=”27/07/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु ” date=”27/07/2019,11:29AM” class=”svt-cd-green” ] 15 तासानंतर जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला, जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला, रात्री 8:00 वाजता बंद झालेला महामार्ग सकाळी 11:15 वाजल्यापासून सुरु करण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”भुशी डॅमकडे जाणारा रस्ता बंद” date=”27/07/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅमकड़े जाणारा रस्ता आज पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत पुराच्या पाण्याचा एसटी डेपोलाही फटका ” date=”27/07/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] 213 पैकी 212 एसटीच्या फेऱ्या रद्द, साडे चार लाखांचं नुकसान, चिपळूण एसटी डेपोत तीन फुटापर्यंत पाणी, ग्रामीण भागातील एसटी सेवेला फटका [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या मार्गात बदल” date=”27/07/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली” date=”27/07/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF चे जवान घटनास्थळी दाखल” date=”27/07/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 147 मिलिमीटर पाऊस” date=”27/07/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पाऊस म्हणजे 235 मिलिमीटर पाऊस, दापोली तालुक्यात 227 मिलिमीटर पाऊस, मंडणगड तालुक्यात 205 मिलिमीटर पाऊस, खेड तालुक्यात 190 मिलिमीटर पाऊस, संगमेश्वर तालुक्यात 166 मिलिमीटर पाऊस, सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात 31 मिलिमीटर पाऊस [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प” date=”27/07/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] खंडाळा घाटात दरड आणि झाड पडल्याने पुणे मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये साप ” date=”27/07/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर येथे अडकली आहे. या ट्रेनमध्ये किमान 2 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेच्या चारही बाजूने पाणी साचल्यामुळे रेल्वेत सापही घुसला होता, असा दावा रेल्वेतील प्रवाशांनी केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”चिपळूण-कराड महामार्ग सुरु” date=”27/07/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] चिपळूण-कराड महामार्ग सुरळीतपणे सुरु झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत पुन्हा दरड कोसळली” date=”27/07/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] दापोली-बांधतीवरे मार्गावर सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळली, दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, सागरी महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो [/svt-event]

[svt-event title=”उल्हास नदीला पूर आल्याने कोल्हापूर-तिरुपती एक्सप्रेस रद्द” date=”27/07/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसच्या मार्गात बदल” date=”27/07/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस सध्या कर्जत येथे असून ती पनवेल मार्गे वळविण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”महालक्ष्मी एक्सप्रेसलाही पावसाचा फटका” date=”27/07/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या सतंतधार पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेलाही याचा फटका बसला आहे. बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्येच थांबवण्यात आली आहे. रेल्वेच्या चारही बाजूने चार ते पाच फूट पाणी साचलं आहे. रेल्वेमध्ये 2 हजार प्रवाशी अडकले असल्यामुळे एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”चेंबूर परिसरातही पाणीच पाणी” date=”27/07/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सायनमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी” date=”27/07/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे बदलापूरमध्ये पूरग्रस्त परिस्थिती ” date=”27/07/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ] बदलापूरमधील रमेशवाडी विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. येथील इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अद्याप प्रशासनाची कोणतीच मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 12 तासापासून बंद” date=”27/07/2019,8:42AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 12 तासापासूंन बंद करण्यात आला आहे. चिपळूणच्या बहादुरशेख परिसरात पाणी आल्याने चिपळूण-कराड महामार्गही बंद केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमधील पवना नदीला पूर” date=”27/07/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील पवना नदीला पूर, निगड़ीमधील यमुनानगर तळवडेकडे जाणारा रस्ता बंद [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहरात 75.2 मिमी तर उपनगरात 192.2 मिमी पावसाची नोंद” date=”27/07/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] गेल्या 24 तासात मुंबई शहरात 75.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर उपनगरात 192.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस बाजारपेठेत पाणी” date=”27/07/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील फुणगुस बाजारपेठेत पाणी साचलं, खाडी पट्यात मुसळधार पावसाचे थैमान, शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपेठेत पुराचे पाणी, खाडी किनाऱ्यालगतची भात शेती पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”बदलापूरजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली” date=”27/07/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] अंबरनाथ, बदलापूर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतच्या दिशेने वाहतुक ठप्प झाली आहे. दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही वांगणी येथे अडकली आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईची लाईफलाईन विस्कळीत” date=”27/07/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनीटे उशिरा, तर हार्बर रेल्वे 30 मिनीटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. [/svt-event]

[svt-event title=”हवाई वाहतूकीला फटका” date=”27/07/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचे ट्विट” date=”27/07/2019,8:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावसाची परिस्थिती पाहून शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचे ट्विट” date=”27/07/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] पावसाची परिस्थिती पाहून शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कर्जत/खोपोली ते बदलापूर लोकल सेवा बंद” date=”27/07/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बदलापूर आणि अंबरनाथ स्टेशन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं खबरदारी म्हणून लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिरानं तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. [/svt-event]

[svt-event title=”हवाई वाहतूकीला फटका, उड्डाण रद्द” date=”27/07/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा फटका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या हवाई वाहतुकीलाही बसला आहे. यामुळे काही विमाने रद्द करण्यात आली आहेत. तर काही विमानांच्या वेळापत्रकांमध्ये बदल केला आहे. [/svt-event]

रायगड : काल रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खोपोली पाली रोड वरील वाहतुक बंद करण्यात आली. तर जाभुंळपाडा, पाली ते वाकण हे दोन्ही पुल पाण्याखाली गेले आहेत. तसेच मुबंई पुणे जुन्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.

रत्नागिरी : चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खर्डी परिसरात पाणी भरल्याने  कराड – चिपळूण मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.  यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर रत्नागिरीतील चिंचनाक, भाजी मार्केट, जुना बाजारपूल यासह इतर परिसरात पाणी साचले आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.