AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या हिताचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, सोलर विजेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल. सोलर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार तयार आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, सोलर विजेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 19, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा निर्णय आज जाहीर केला. फडणवीस म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सरकारनं फीडर सोलरायझेशनचा निर्णय घेतला. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे. याकरिता कृषीच्या फीडरचे सोलरायझेशन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली जमीन तीस वर्षांच्या भाड्यावर द्यावी. एकरी ५० हजार रुपये म्हणजे हेक्टरी सव्वा लाख रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीस वर्षांनंतर शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळेल. दरवर्षी यामध्ये तीन टक्यांची वाढ होईल.

फीडरच्या पाच किलोमीटरच्या भागातील कुठलीही खासगी जमीन सोलर ऊर्जेसाठी घेण्यात येणार आहे. सरकारी जमीन ही पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील घेण्यात येणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज सात रुपयांची

ते म्हणाले, या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल. सोलर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार तयार आहेत. शेतकऱ्याला देण्यात येणारी वीज ही सात रुपयांची पडते. शेतकऱ्यांकडून दीड रुपया वसूल केला जातो. बाकीची शेतकऱ्याला सबसिडी दिली जाते.

सोलर वीज तीन रुपयांत मिळणार

सोलरची वीज ही तीन रुपयांपासून तीन रुपये वीस पैसेपर्यंत मिळणार आहे. यामुळे सबसिडीत घट होणार आहे. यामुळे कोळशाचा वापर कमी होईल. त्यामुळे होणारे नुकसान कमी होईल. देशात असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचं त्यांनी म्हंटलं.

यामुळे दिवसा विजेची मागणी पूर्ण होईल

राळेगणसिद्धीला फीडर करण्यात आले होते. ते व्यवस्थित सुरू आहे. त्यानंतर जवळपास ९०० मेगावॅटचे फीडर तयार केले आहेत. आता ८ हजार मेगावॅटच्या फीडरचे सोलरायझेशन करायचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करता येईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दिव्यांगांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले. केंद्राप्रमाणे काही निकष बदलवणे गरजेचे होते. ते केले असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

साखर कारखान्यांबाबत निर्णय

साखर कारखान्याच्या प्रस्तावासंदर्भात उपसमिती तयार करण्यात आली आहे. त्यासोबत काही तत्व तयार करायला सांगितले आहे. एखाद्या कारखान्याला कर्ज घ्यायचं असेल तर असेट व्हॅल्यूच्या किती रक्कम कर्ज घेता येते याचा नियम रिझर्व्ह बँकेने काढला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार