NCP : पांडुरंगाची इच्छा असली तर… आता राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा, अमोल मिटकरींचा तो मोठा दावा काय?
Amol Mitkari on NCP : दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना आता चांगलीच हवा मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीविषयी थेट बातमी देण्याचा डाव टाकला आहे. तर आता राष्ट्रवादीतील दोन गटांच्या एकत्रिकरणाविषयीची चर्चा पुढे आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना गती आली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीविषयी आता संदेश नाही तर थेट बातमी देणार असल्याचे म्हटले आहे. तर आता राष्ट्रवादीतील दोन गटांच्या एकत्रिकरणाविषयीची चर्चा वेगाने पुढे आली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी मोठा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले मिटकरी?
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे. राज्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येतील का असा सवाल अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला होता. दोन भाऊ अनेक वर्षांनी एकत्र येते असतील तर राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणारच आहे. कुणालाच कमजोर समाजायचे नाही. राजकीय परिणाम होणार असे मिटकरी ठाकरेंच्या युतीवर म्हणाले. तर राष्ट्रवादीतील दोन गट कधी एकत्र येणार याविषयी त्यांनी मोठे संकेत दिले. पांडुरंगाची इच्छा असली तरी आषाढी एकादशीपर्यंत दोन्ही एकत्र येतील असे मिटकरी म्हणाले. पण त्याचवेळी असा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 10 जून रोजी पक्षाचा मेळावा पुण्यात होत आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत वाट बघा असे मोठे संकेत मिटकरी यांनी दिले.
सरकारमध्ये राष्ट्रवादी नको
लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील केवळ दादांच्या अर्थखात्याला टार्गेट करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेनेतील नेते सरकार सेनेनं आणलं आम्हाला राष्ट्रवादी नको असा सूर आळवत आहेत. ते राष्ट्रवादी गटाचं अस्तित्वच मान्य नसल्याचे म्हणत आहेत. सरकार आम्ही आणलं आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना सत्तेत आणलं असा आरोप शिंदे गटाने केला आहे. एकनाथ शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी अजितदादांच्या गटाला टार्गेट केले आहे. इतिहास सेनेने घडवला, भाजपासोबत राज्यात युतीचे सरकार आणले. हे महायुतीचे सरकार आम्हाला नको, युतीचेच सरकार हवे असा दावा शिंदे गटातून करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकीकरणाविषयीच्या चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
