International women’s day 2021 | मुंबईसह, नवी मुंबईकर महिलांसाठी खास कोव्हिड लसीकरण केंद्र

मुंबईतील महिलांसाठी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. (Special covid vaccination center for women)

International women’s day 2021 | मुंबईसह, नवी मुंबईकर महिलांसाठी खास कोव्हिड लसीकरण केंद्र

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. मुंबईतील माहिम परिसरात हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. (International women’s day 2021 Special covid vaccination center for women)

मुंबईतील महिलांसाठी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी आहेत. तसेच महिलांकडूनच महिलांना लस दिली जात आहे. या लसीकरण केंद्रातही महिलांनाही प्राधान्य दिले जात आहे. पुरुषांनाही या केंद्रावर लस घेता येणार आहे.

तसेच या ठिकाणी लसीकरणाच्या टप्प्यांनुसारच लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लस देण्यातआली. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. यापुढेही केंद्राच्या नियमानुसार लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे तिन्ही टप्प्यांमध्ये हे लसीकरण महिलांकडून केले जाणार आहे. त्याच्यामुळे माहीम लसीकरण केंद्र यापुढे महिलांकडून संचलित केले जाणार आहे.

नवी मुंबईत विशेष कोव्हिड लसीकरण केंद्र

तर दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिकेकडून चार महिला विशेष कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार ही केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे अंतर्गत शाळा क्र.25, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचपाडा ऐरोली मार्फत नमुंमपा शाळा क्र.53, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे मार्फत नमुंमपा सीबीएसई शाळा सेक्टर 11 कोपरखैरणे येथे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव, सेक्टर २, वाशी या चार लसीकरण केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजपासून लसीकरण सुरु केले आहे. या केंद्रांवर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस पुरुष आणि महिला असे दोघांचेही लसीकरण होणार आहे.

आजपासून ही 4 केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या प्रत्येक केंद्रावर प्रतिदिनी 100 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील कोमाॅर्बिड व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच 3 महापालिका रूग्णालये आणि 7 खाजगी रुग्णालयातील कोव्हीड 19 लसीकरण केंद्रात आणखी 4 लसीकरण केंद्रांची भर पडत असल्याने नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. (International women’s day 2021 Special covid vaccination center for women)

संबंधित बातम्या : 

International women’s day 2021 | गावाचा सगळा कारभार फक्त महिलांकडे; अहमदनगरच्या ‘या’ गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा

International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

Published On - 11:13 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI