AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपर फुटला महाराष्ट्रात, कनेक्शन या चार राज्यात, तिसऱ्या राज्याचं नाव आल्याने सर्वच चक्रावले; पोलिसांची पथके रवाना

महाराष्ट्रातील TET पेपरफुटी प्रकरणावर आता एक अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके आता वेगवेगळ्या राज्यांत रवाना झाली आहे.

TET पेपर फुटला महाराष्ट्रात, कनेक्शन या चार राज्यात, तिसऱ्या राज्याचं नाव आल्याने सर्वच चक्रावले; पोलिसांची पथके रवाना
TET PAPER LEAK
| Updated on: Jun 29, 2026 | 9:27 AM
Share

महाराष्ट्र टीईटी परीक्षा 28 जून 2026 रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार होती. मात्र, परीक्षेच्या केवळ एक दिवस आधी महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी झाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, परीक्षेच्या अवघ्या 24 तास आधी ठाण्यात पेपरफुटी झाली. या पेपरफुटीनंतर शिक्षण विभागाने आता शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. ठाण्यात एका कारवाईनंतर पोलिसांनी पेपर जप्त केला. या प्रकरणी अनेक व्यक्तींना ताब्यातही घेण्यात आले आहे. भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तीन लोक TET चा पेपर विकायला गेले होते. आता या प्रकरणावर एक मोठी अपडेट समोर आली आहे. तिघांकडे 4 सेट पेपर आढळले तर यानंतर शिक्षण विभागाने ते पेपर तपासले. यानंतर ते पेपर होणाऱ्या परिक्षेच्या समान आढळले. यात विशेष तपास पथकाची नेमणुक केली गेली आहे.

पुढील तपासासाठी पथक रवाना झाले आहे. 1 डिसीपी, 2 एसीपी, 9 पीआए पिएसआय आणि 20 कर्मचारी यांचे मिळुन पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक अधिक तपासासाठी विविध राज्यात रवाना झाले आहे. तर पोलिसांनी पुढे आणखी माहिती देत म्हणाले की, ” या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. त्याचा शेध सुरु आहे. 2 बिहारी आणी 1 हरियाणाचा आहे अशी माहिती दिल्लीतून समोर आली आहे.” पेपर विकताना आरोपींनी दीड करोड रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ते बाकी लोकांना विकणार होते. सर्व शक्यतांना अनुसरुन तपास सुरू आहे. पेपर त्यांनी दिल्लीवरुन आणले असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी पेपर कोणाला विकले याचे चौकशी सुरु आहे.

कोणत्या चार राज्यांत पथके रवाना?

आता या प्रकरणावर एक अपडेट समोर आले आहे ते म्हणजे महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता राज्याबाहेर, दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. भिवंडीतील तिघा आरोपींना न्यायालयाने 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पेपरफुटीमागे आंतरराज्य रॅकेटचा संशय, मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे. जप्त मोबाईल, डिजिटल पुरावे आणि बनावट ओळखपत्रांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवली. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन, पेपरफुटीतील संपूर्ण साखळी उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा