IRB कडून राज्य सरकारकडे 6 हजार 500 कोटींचा पहिला हप्ता जमा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकरवसुली अधिकारासाठी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.

IRB कडून राज्य सरकारकडे 6 हजार 500 कोटींचा पहिला हप्ता जमा
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 8:35 PM

मुंबई : ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा‘वरील (IRB Cheque For Mumbai-Pune Expressway) पथकरवसुली अधिकारासाठी देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी आणि राज्य सरकारच्यावतीने मंत्रालयात याचा औपचारिक स्विकार केला (IRB Cheque For Mumbai-Pune Expressway).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकरवसुलीसाठी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात पथकरवसुली संदर्भात 8 हजार 262 कोटी रुपयांचा करार झाला होता. पहिल्या वर्षी आयआरबीकडून सरकारला 6 हजार 500 कोटी, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 850 कोटी, तसेच चौथ्या वर्षी 62 कोटी मिळणार आहेत (IRB Cheque For Mumbai-Pune Expressway).

संबंधित बातम्या :

अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरण : गृहमंत्र्यांसह नितीन राऊतांचा दबाव, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Ganeshotsava 2020 | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.