AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही माहीत नसते, तर… जितेंद्र आव्हाड यांचा कुणावर निशाणा?

Jitendra Awhad : राज्यात विधानसभेच्या तोंडावर नेत्यांच्या भात्यातून एक एक जहाल अस्त्र बाहेर पडत आहेत. टीकांचे बाण सूटत आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाडांनी त्यांना असा खोचक टोला लगावला.

शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही माहीत नसते, तर... जितेंद्र आव्हाड यांचा कुणावर निशाणा?
जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला
| Updated on: Sep 07, 2024 | 4:44 PM
Share

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकासा आघाडीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही गोटातून गोटमार करण्यात येत आहे. शा‍ब्दिक टीकांनी एकमेकांना घायाळ करण्यात येत आहे. शुक्रवारी टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीत कोण मुख्यमंत्री होणार यावरुन त्यांनी टीका केली होती. त्याला आज जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते फडणवीस?

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली होती. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा केली. पण बैठकीचे छायाचित्र काढण्यास परवानगी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच लागले नाही. आता तर शरद पवार यांनी पण स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण तीच री ओढली. उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे, ते घडून येताना दिसत नाही. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही, असे फडणवीस म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला

जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोला उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्रंना काय माहिती असणार असा पलटवार आव्हाड यांनी केला आहे.

खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही

आज गणेशोत्सव निमित्त आलो होतो माहिती घेतली ते येणार होते, मी आलो. भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार त्यांच्या घरी गर्दी खूप होती, असे ते म्हणाले. सुप्रिया ताईंचे तसे वक्तव्य नव्हते, त्या असं कधीच बोलत नाहीत, पत्रकारांनी चुकीची माहिती दिली आमचे वैचारीक मतभेद आहेत पण मैत्री आहेत. आमची मैत्री आहे पण मुख्यमंत्री झाल्या पासून त्यांचे मित्र वाढलेत असे आव्हाड म्हणाले. खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही, असा चिमटा त्यांनी अजितदादा यांना काढला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...