VIDEO: पोर्न रॅकेटशी काहीच घेणंदेणं नाही, काशिफ खानचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

क्रुझवरील पार्टीचा संयोजक काशिफ खान हा ड्रग्ज रॅकेट आणि पोर्न रॅकेट चालवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. (kashiff khan reply to Nawab Malik over his allegations)

VIDEO: पोर्न रॅकेटशी काहीच घेणंदेणं नाही, काशिफ खानचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर
nawab malik


मुंबई: क्रुझवरील पार्टीचा संयोजक काशिफ खान हा ड्रग्ज रॅकेट आणि पोर्न रॅकेट चालवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्याला काशिफ खान यांनी उत्तर दिलं आहे. माझा कोणत्याही पोर्न रॅकेटशी संबंध नाही, असं फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ खान यांनी म्हटलं आहे.

काशिफ खान यांनी मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. नवाब मलिक यांचे आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं. आपल्यावरील आरोप निराधार आहेत, असं खान यांनी सांगितलं.

फॅशन टीव्ही इंडियाने क्रुझवर आयोजित केलेल्या एका इव्हेंटचा मी प्रायोजक होतो. मी स्वत: टिकीट काढून तिथे गेलो होतो. मी माझ्या क्रेडिट कार्डवरूनच खाण्यापिण्याचं आणि रुमचं भाडं भरलं. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मलिक यांनी आरोपाआधी…

नवाब मलिक हे बलवान मंत्री आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांच्या आरोपामुळे आम्हालाच धक्का बसला, असं सांगतानाच मलिक यांनी आरोप करण्यापूर्वी तथ्य जाणून घ्यावीत. त्यानंतर काही बोलावं. पण माझा पोर्न किंवा कोणत्याही ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आर्यनला क्रुझवर पाहिलं नाही

आर्यन खानबाबतही काशिफ खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आर्यनला मी क्रुझवर पाहिलं नाही. मी त्याला ओळखतही नाही. तसेच क्रुझवर काय काय झालं याचीही मला माहिती नाही. क्रुझवर कोणी काय घेतलं याचीही मला माहिती नाही. मी तिथे केवळ एक प्रायोजक म्हणून होतो, असं त्यांनी सांगितलं.

वानखेडेंना कधीच भेटलो नाही

यावेळी त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी वानखेडेंना या पूर्वी कधीच भेटलो नाही. त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही. याप्रकरणी कोणत्याही एजन्सीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते कोण होते?

क्रुझवरील पार्टी दिल्लीतील एका कंपनीने आयोजित केली होती. त्यांच्यासोबत आमचे लोक काम करत होते. मात्र, हे लोक कोण होते त्यांना आम्ही ओळखत नाही. ड्रग्स संदर्भात कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. एखाद्या इव्हेंटचे आम्ही प्रायोजक असू तर त्या ठिकाणच्या लोकांचा स्वभाव आणि कामांची माहिती असतेच असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

VIDEO: काँग्रेस नेते वेल कल्चर, ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी

समीर वानखेडेंचे शागीर्द कोण? हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणार; नवाब मलिक यांच्या विधानाने खळबळ

(kashiff khan reply to Nawab Malik over his allegations)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI