AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समीर वानखेडेंचे शागीर्द कोण? हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणार; नवाब मलिक यांच्या विधानाने खळबळ

भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. (i will expose some maharashtra leader name in monsoon session, says Nawab Malik)

समीर वानखेडेंचे शागीर्द कोण? हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणार; नवाब मलिक यांच्या विधानाने खळबळ
Nawab Malik
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई: भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल, असं खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे हे नेते कोण? असा सवाल केला जात आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक दावा केला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी जी परिस्थिती होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड वानखेडेंना भेटत आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे. हे उघड होईल, असं सांगतानाच येणारं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेत मी जे काही समोर आणणार या राज्यात ते नेते तोंड दाखवू शकणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.

विषयांतर होऊ देणार नाही

अधिवेशनात माझं नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी विषय डायव्हर्ट करावा म्हणून प्रयत्न होईल. पण मी कुणाचं नाव घेऊन मी विषय डायव्हर्ट करणार नाही. पण हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ड्रग्जच्या अँगलने तपास का केला नाही?

ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पोर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चालवतो. त्याला अटक का केली नाही? ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीचा आयोजकची पार्श्वभूमीच ड्रग्ज रॅकेटची असताना त्या अँगलने तपास का केला नाही? असा सवाल करतानाच पार्टीतील 1300 लोकांचा तपास का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

होय मी भंगारवाला आहे

मी काही लोकांची पोलखोल केली आहे. त्यामुळे माझे वडील भंगारवाला होते म्हणून मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक बुडली नाही. सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही, असा शब्दात मलिक यांनी सुनावले.

संबंधित बातम्या:

महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा

जलयुक्त शिवार योजनेचे लाभार्थी राजकीयच, क्लिनचिट नसताना मिळाली म्हणून बोंबलतायत, कुठे मिळते हे अजब रसायन?, सामनातून टीका

(i will expose some maharashtra leader name in monsoon session, says Nawab Malik)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.