AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ज्यानी भ्रष्टाचार केलाय त्यांनाही तुरुंगात भरती करणार का?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

VIDEO: ज्यानी भ्रष्टाचार केलाय त्यांनाही तुरुंगात भरती करणार का?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ज्यानी भ्रष्टाचार केलाय त्यांनाही तुरुंगात भरती करणार का?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 11:53 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांना केला. स्पर्धा चाललीये. जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. आतापर्यंत मला 14 नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात(jail) जातात, असा टोमणाही त्यांनी लगावाला. किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दोन पोलीस हवालदारांना पुणे हल्ल्यांबद्दल निलंबित केलं, काय ऋडलं नाही तर का निलंबित केलं, एवढं का घाबरलात?, कोविड घोटाळा बाहेर येतोय त्यामुळे ठाकरे घाबरले आहेत. कोव्हिड घोटाळेबाजांना सजा होणार. तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांना टेंडर कसं दिलं? सजा होणारच, असं किरीट सोमय्या म्हणाले.

घोटाळ्याला ठाकरे जबाबदार

सुजित पाटकर आणि राजीव साळूंखेंचे काय संबंध आहेत हे संजय राऊतांच्या मुलींना सांगू द्या. संयुक्तपणे जमिनी खरेदी केल्या आहेत. राजीव साळुंखेंचं वार्षिक उत्पन्न 70 हजार आहे आणि त्यांना 100 कोटींचं टेंडर मिळालं. कोव्हिड घोटाळ्यांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुजित पाटकर जबाबदार आहेत. ही कंपनी केव्हा तयार झाली, उलाढाल किती, स्टाफ किती, खोटे पुरावे सादर करून राज्यात लोकांची हत्या केली, अशी टीकाही त्यांनी केली.

आरोप काय?

यापूर्वीही सोमय्या यांनी या घोटाळ्यावरून आरोप केले होते. लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे साळुंखे यांचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. 9 दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात 7 कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. 65 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. तसेच साळुंखेंना पुण्यातील 100 कोटींच्या जम्बो कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर

VIDEO: चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं ‘टीव्ही9’ला रोखठोक उत्तर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.