AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा

Ladki Bahin Yojana Government Saved Rupees : लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले, वाचून धक्का बसला ना. पण हे खरेच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारी भावांच्या खिशावर ताण येताच त्यांचा जीव लगेच तुटला. वेड्या बहिणीची वेडी ही माया सरकारला दिसून आली.

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा
| Updated on: Feb 25, 2025 | 12:18 PM
Share

लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव कासावीस झाला. त्यांनी लागलीच हक्कसोड चळवळ राबवली आणि सरकारची तिजोरी पुन्हा भरली. निकषांच्या कुरघोडीमुळे अनेक बहिणी बाद झाल्या. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले. तिजोरीवरील ताण कमी झाला. अजून किती बहि‍णींना सरकार पुळका येतो, हे लवकरच समोर येईल.

9 लाख बहिणी बाद

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेने एकदम जादू केली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही निकष नसलेल्या या योजनेचा राज्यातील कोट्यवधी बहि‍णींनी लाभ घेतला. खात्यात धडाधड रक्कम जमा झाली. निवडणुकीचे कवित्व संपताच निकषाचा आसूड उगरण्यात आला. निकषाच्या शाळेत अनेक बहिणी अडकल्या. अनेकांनी उगी झंझट नको म्हणून या योजनेला हक्कसोड दिला. हक्कसोड मिळताच सरकारच्या तिजोरीवर आलेला ताण एकदाचा कमी झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 लाख बहिणी या योजनेतून बाद झाल्या.

सरकारचे वाचले 1620 कोटी

निकषाच्या एका निर्णयाने राज्यातील अनेक बहि‍णींना फटका बसला. निकषाच्या कात्रीत अनेक महिला बाद झाल्या. या योजनेत काही पुरुषांनी पण खाते उघडल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाले होते. तर काही जणांच्या नावावर अनेक खाती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर निकषाचा हातोडा मारण्यात आला. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. तर या योजनने सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचे उघड झाले. सरकारमधील त्रिमूर्तिनी अर्थातच त्याचा इन्कार केला. आता लाभार्थ्यांसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत. या चाळणीमुळे सरकारचे 1620 कोटी वाचले आहेत. 9 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्याने, सरकारच्या 1620 कोटी रुपये वाचले.

2.5 कोटी महिलांना फायदा

ही योजना गेल्यावर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेतील महिलांचा वयोगट 30-39 वर्षो वयोगटातील 29 टक्के महिलांचा समावेश, 40-49 गटातील 23.6 टक्के, 50-65 वयोगटातील 22 टक्के, 60-65 वयोगटातील 5 टक्के महिला आहे. आता नवीन निकषांची चर्चा होत आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी चर्चा आहे. योजनेसाठी आधारकार्ड व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना