Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : भ्रष्टाचाराच्या कुरणात लाडकी बहीण योजनेची पण भर; राज्यात 44 योजनांना लाचखोरीचे ग्रहण, इतके गुन्हे दाखल

Ladki Bahin Yojana Corruption : राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. या योजनेतील दोन हप्ते राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. पण त्यासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागले. आता या योजनेला पण भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

Ladki Bahin Yojana : भ्रष्टाचाराच्या कुरणात लाडकी बहीण योजनेची पण भर; राज्यात 44 योजनांना लाचखोरीचे ग्रहण, इतके गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेला भ्रष्टाचाराची कीड
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 11:57 AM

राज्यात लाडकी बहीण योजनेने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिव्य पार केल्यानंतर महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. तर या ऑगस्ट महिन्यात नाव नोंदणी झालेल्या महिलांना पुढील महिन्यात तीन हप्ते देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. ही योजना सुरु होताच तिला भ्रष्टाचाराचे ग्रहण पण लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. राज्यात एकूण 44 योजनांना लाचेची कीड लागली आहे. लाचखोरांनी अनेक योजना पोखरल्या आहेत. लाडक्या बहीण योजनेत लाच मागितल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्वसामान्यांच्या योजनांवर डल्ला

सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजनांवर लाचखोरांचा डोळा असतो. सरकारी कार्यालयातील अधिकारी या योजनेसाठी लाच घेतात. फाईलवर वजन ठेवल्यासाठी ती पुढेच सरकत नसल्याचे सर्वसामान्यांचा अनुभव आहे. गेल्या 8 महिन्यात राज्यातील 44 विविध कल्याणकारी योजनांमध्ये 48 लाचखोरीचे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने आकडेवारी सादर केली आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक पिळवणूक

विविध योजना या सरकारी बाबू आणि त्यांच्या चेल्याचपट्यांसाठी कुरणच असतात. विविध विभाग कल्याणाकारी योजना राबतात. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचा अर्ज आला की, विविध नियमांकडे बोट दाखवत लाभार्थ्यांना जेरीस आणण्यात येते. त्याची कागदपत्रे योग्य असली तरी सरकारी अधिकारी उद्या या, परवा या, साहेब नाहीत, अशी कारणं देऊन वेळ मारुन नेतात. त्यामुळे अखेरीस जनतेला लक्ष्मी दर्शनाचा पर्याय उरतो. फाईलमध्ये, टेबलाखालून लाच दिली की झटदिशी काम होते. या योजना एकप्रकारे अर्थसहाय्य करत असतानाच आर्थिक पिळवणूकीचे अड्डेच झाल्या आहेत. ज्यांना लाच देण्याची इच्छा नसते, ते या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करतात. 2024 या वर्षात जानेवारी ते या ऑगस्टपर्यंत एकूण 48 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशी आहे आकडेवारी : Ladki bahin Yojana

लाडकी बहीण योजनेला भ्रष्टाचाराची कीड

लाडकी बहीण योजना नुकतीच सुरु झाली आहे. बहि‍णींना या योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यात, बँक खाते उघडण्यात, लिंक करण्यातच वेळ गेला. पण इतक्या कमी कालावधीतही या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून आले. या योजनेतंर्गत आतापर्यंत १ कोटी ३ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेत लाच स्वीकारल्याप्रकरणात 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार केली म्हणून हे गुन्हे दाखल झाले आहेत. तर तक्रार न केलली किती प्रकरणं असतील?

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.