AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर, फसवणूक होण्याचा धोका

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलेचे नाव बँकेचा आयएफसी कोड आणि मोबाईल नंबर असल्याने या महिलांची ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

लाडकी बहीण लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर, फसवणूक होण्याचा धोका
ladki bahin yojana
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 20, 2024 | 2:51 PM
Share

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी असलेल्या महिलांची वैयक्तीक माहिती समाज माध्यमांवर आली आहे. पालघरमधील 11,172 लाडक्या बहिणींची वैयक्तिक माहिती समाज माध्यमांवर आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे या लाडक्या बहिणींची येत्या काळात ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही त्रुटी असलेल्या महिलांची वैयक्तिक माहिती संबंधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवली आहे. ही यादी समाज माध्यमांवर देखील अनेक ठिकाणी आली आहे.

ही माहिती समाज माध्यमांवर

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलेचे नाव बँकेचा आयएफसी कोड आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर आल्याने या महिलांची ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून महिलांना कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला तर आपली वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये, असा आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.

पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये गर्दी

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. मात्र बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. बँकेच्या बाहेर लाभार्थी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. त्यामुळे बँकेचे इतर कामे ठप्प झालेली पाहायला मिळते.

बीडमधील परळीतील एसबीआय बँकेत केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई – केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी 15 ऑगस्ट नंतर बँकांबाहेर महिलांची रांगा दिसून येते आहे. 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर अनेक वंचित असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस बँक सेतू सुविधा केंद्र येथे गर्दी करत आहेत. धाराशिव-उमरगा शहरातील बँकेच्या मुख्य शाखेत आज सकाळपासून इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेक योजनेचे लाभार्थीना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सध्या लाडक्या बहीण योजनेचे केवायसी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला येत असून कनेक्टिव्हिटी नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होताना दिसत आहे.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?