AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी; पोलिसांनी तिन्ही तरुणांच्या मुसक्या आवळल्या

सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी; पोलिसांनी तिन्ही तरुणांच्या मुसक्या आवळल्या
| Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 5:14 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी कांदिवलीतून ताब्यात घेतलं आहे. नोमन डिसोजा असं या तरुणाचं नाव असून तो पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात राहतो. नोमनसह हा व्हिडीओ बनवणाऱ्या त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात असलेल्या जय भारत या एसआरए इमारतीत गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अधिक तपास करत ही कारवाई केली आहे. (Life-threatening stunts; Police caught a glimpse of the three young men)

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर आयपीसी कलम 336 (स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे) कलम 34 (एकापेक्षा अनेक आरोपींचा एकच हेतू) तसेच आयटी अॅक्टमधील कलन 66(a) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 22 वयोगटातील ही तिन्ही मुलं सिनेमा, टीव्ही मालिकेत, डान्स रिअॅलिटी शोमध्ये छोटी मोठी कामं करतात. त्याचसोबत हे तिघेही उत्तम डान्सर असून त्यांनी ‘बागी’ आणि ‘सिंबा’ सारख्या बॉलिवूडच्या सिनेमांतील काही गाण्यात एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम केलेलं आहे.

काय होत नेमकं त्या व्हायरल व्हिडीओत?

नोमन हा एका उंच इमारतीच्या धोकादायक भागावर जाऊन स्टंटबाजी करत होता. तो दोन्ही हातांवर उभं राहून हॅडस्टर्न करत होता. तर दुसरे दोन तरुण त्याचा व्हिडीओ तयार करत होते. या व्हिडीओमध्ये आजूबाजूचा परिसर देखील दाखवण्यात आला असून नोमन अतिशय धोकादायक पध्दतीने स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या : 

वांद्रे, पाली हिल, जुहू, खार, अंधेरीत ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश, NCBची मोठी कारवाई

ठाण्यात एसटीचा भीषण अपघात, महिलेनं गमावले दोन्ही पाय

करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी

(Life-threatening stunts; Police caught a glimpse of the three young men)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.