Video : पावसाची संततधार मात्र तरीही मुंबईकरांच्या लसीसाठी रांगा, बीकेसी-नेस्कोबाहेर लोकांची गर्दी

मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पण अशाही वातावरणात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (Line for Mumbaikars over vaccine, crowds outside BKC-Nesco)

Video : पावसाची संततधार मात्र तरीही मुंबईकरांच्या लसीसाठी रांगा, बीकेसी-नेस्कोबाहेर लोकांची गर्दी
मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पण अशाही वातावरणात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबई : मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पण अशाही वातावरणात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटर लसीकरण केंद्रावर पहाटे पाच पासून नागरिकांनी लसीसाठी रांगा लावल्या होत्या. तर गोरेगावातल्या नेस्को सेंटर गेटबाहेर लांबच लांब रांग पाहायला मिळाली.

आज मुंबईतल्या 28 लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोज दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पावसाचं वातावरण असूनही लसीकरण केंद्रार गर्दी केली आहे. भर पावसात नागरिक लस घेण्यासाठी रांगेत थांबत आहेत. बीकेसी बाहेर जवळपास अर्धा किलोमीटरची रांग पाहायला मिळाली.

बीकेसीबाहेर अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा

50 टक्के वॉकइन आणि ५० टक्के ऑनलाईन नोदणी केलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे मोठा घोळ पाहायला मिळतोय. मुंबईत लसीचा साठा मर्यादित असल्याने लोक हैराण आहेत. काही लोक गेल्या सात दिवसांपायून इथे येत आहेत तरी डोज मिळत नाही, अशी अवस्था आहेत. गेले अनेक दिवस विनाकारण लोक पायपीट करत आहेत. परंतु लोकांना लस मिळत नाही. मनपाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्याची अनेकांनी तक्रार केलीय.

नेस्को सेंटर गेटबाहेरही नागरिकांच्या लसीसाठी रांगा

मुंबईत गोरेगाव पूर्वेत नेस्को सेंटर गेटबाहेर लस घेण्यासाठी आज सकाळीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नेस्को सेंटर गेटबाहेर लोकांनी रात्री दहा वाजेपासून लाईन लावायला सुरुवात केली होती. लस घेण्यासाठी भर पावसात रात्रभर लोक रांगेत उभे राहिले. या रांगेत काही लोकं असे आहेत की जे मागील काही दिवसापासून दररोज या ठिकाणी लाईन लावतात मात्र त्यांचा नंबर येईपर्यंत लसीच्या साठा संपून जातो. ज्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाती घरी जावं लागत आहेत, आज लस मिळावी यासाठी लोकांनी लस घेण्यासाठी गोरेगाव नेस्को सेंटरबाहेर रात्रीपासून रांगेत उभे राहिले आहेत.

(Line for Mumbaikars over vaccine, crowds outside BKC-Nesco)

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर, वाचा 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये

कोरोना निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारकडून ‘ओपनिंग अप’चा मंत्र, लोकलबाबतचा निर्णय अद्याप नाही!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI