AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम : प्रविण दरेकर

चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम : प्रविण दरेकर
pravin darekar
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने चिक्की प्रकरणात कंत्राटदारावर एफआयआर का दाखल केला नाही, अशी विचारणा केली आहे. परंतु त्याचा पंकजा मुंडे यांच्याशी काहीएक संबंध नसून या प्रकरणाविषयीचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत दिले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्याचा आरोप थेट मंत्र्यावर करणे योग्य नाही. शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. (Linking Pankaja Munde with Chikki scam is not rights says Pravin Darekar)

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? अशी विचारणा केली आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, एखाद्या गोष्टीत मंत्र्याचा थेट हस्तक्षेप होऊन जर घोटाळा झाला असेल तर आरोप करता येतात. पण प्रशासकीय कंत्राटदाराकडून गैरव्यवहार झाले असतील तर त्याला ते जबाबदार असतात. त्यामुळे मंत्र्याची चूक नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.

दरेकर म्हणाले की, यासंदर्भात त्यावेळी विधिमंडळात गदारोळ झाला. प्रसिद्धी माध्यमातून चुकीचे चित्र उभे करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सभागृहात यासंदर्भात योग्य ते स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे आता यामध्ये काही तथ्य नसून पंकजा मुडे यांच्या अडचणीत वाढ होणार नाही, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता.

कथित चिक्की घोटाळा नेमका काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल 206 कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात 24 आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण 3 लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.

संबंधित बातम्या 

आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत : धनंजय मुंडे

फडणवीसांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, 4 मंत्र्यांचा येत्या अधिवेशनात निकाल?

(Linking Pankaja Munde with Chikki scam is not rights says Pravin Darekar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.