AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खातेवाटपात मोठे फेरबदल, शिंदे मंत्रिमंडळात आता कुणाला कोणतं मंत्रीपद?

महाराष्ट्र सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात नवनियुक्त मंत्र्यांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे खातेवाटप करत असताना सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

खातेवाटपात मोठे फेरबदल, शिंदे मंत्रिमंडळात आता कुणाला कोणतं मंत्रीपद?
| Updated on: Jul 14, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात नवनियुक्त मंत्र्यांना काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे खातेवाटप करत असताना सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारमधील प्रत्येक मंत्र्याकडे कोणतं खातं आहे, याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालायकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

नव्या खातेवाटपानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

  • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  • चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
  • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  • धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
  • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
  • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय रविंद्र सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
  • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
  • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.