Pod Taxi Service | लंडनसारखी पॉड टॅक्सी मुंबईत धावणार, पाहा कोणत्या मार्गावर सेवा सुरु होणार ?

परदेशातील लंडनच्या हिथ्रो विमानतळावर असलेल्या पॉड टॅक्सीची सुविधा आता आपल्याला आपल्या देशातही मिळणार आहे. लंडन, दुबई आणि सिंगापूर येथे असलेली ड्रायव्हर लेस पॉड टॅक्सीचे तंत्रज्ञान आपल्या देशात देखील दाखल होत आहे.

Pod Taxi Service | लंडनसारखी पॉड टॅक्सी मुंबईत धावणार, पाहा कोणत्या मार्गावर सेवा सुरु होणार ?
pod taxiImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 9:15 PM

मुंबई | 5 मार्च 2024 : लंडनचे हिथ्रो विमानतळ किंवा दुबई-सिंगापूर येथील पॉड टॅक्सीच्या धर्तीवर पहिली पॉड टॅक्सी मुंबईतील वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान बीकेसी परिसरात सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रकल्प पीपीपी मॉडेलवर सरकारी आणि खाजगी भागीदारीतून सुरु करण्यास आज मंत्रालयात झालेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली आहे. पॉड टॅक्सी हा वाहतूकीचा आधुनिक प्रकार असून त्याद्वारे बीकेसीतील वाहतूकीची समस्या दूर होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहेत. महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 15 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त करारही करण्यात आला आहे.

वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून ( बीकेसी ) पॉड टॅक्सी चालविण्याची योजना आहे. या मार्गाचे अंतर 8.80 किमी एवढे आहे. त्यामध्ये एकूण 38 स्थानके असणार आहेत. पॉड टॅक्सीची क्षमता प्रति पॉड सहा प्रवासी अशी असणार आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा पॉड टॅक्सीचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सुरू करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या योजनेमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या अरेरावी आणि दादागिरीतून सामान्य प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

एसआरए आणि एमएमआरडीएचा करार

मुंबई महानगरातील बरीच वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 15 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. याप्रकल्पात पुर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे दोन हजार झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडी क्षेत्रात देखील सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत दिले.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील पालिका परिवहन सेवेच्या मालकीच्या बस डेपोच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात येणार आहे. तसेच सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या सरकारी जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊन ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या योजना पाईपलाईनमध्ये

बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम ( ठाणे कोस्टल रोड ), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणेपर्यंत विस्तारीकरणा प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या 8.25 कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग 8 च्या ( रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता ) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.