AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला, पाहा कोणाला मिळाली उमेदवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर यंदा आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ही मनसेने आपला उमेदवार दिला आहे. येथे महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला, पाहा कोणाला मिळाली उमेदवारी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 22, 2024 | 10:36 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कल्याण ग्रामीणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनादरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी यादी लवकरच जाहीर होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर आज उशिरा रात्री मनसेची यादी जाहीर झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मनसेकडून अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागच्या निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. पण यंदा मात्र वरळीमधून मनसेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि विजय देखील मिळवला होता. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे येथे तिंरगी लढत पाहायला मिळू शकते. अमित ठाकरे यांच्याविरोधात ठाकरे गट उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव यांची ही घोषणा केली होती. अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंसाठी महायुतीकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो. कारण राज ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचं देखील बोललं जात आहे. बैठकीत राज ठाकरे यांनी माहीम ऐवजी शिवडी आणि वरळी विधानसभा मतदारसंघात पाठिंबा मागितल्याचं बोललं जातंय. जर महायुतीने मनसेला पाठिंबा दिला तर ही लढत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे महायुती देखील मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देणार का याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. माहीमची निवडणूक बिनविरोध होणार की ठाकरे आपला उमेदवार देणार याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा