Corona : कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब

राज्य सरकारने या विद्यार्थांसाठी परत येण्याची व्यवस्था केली असून तब्बल 100 एसटी बस लवकरच रवाना होणार आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था केली आहे.

Corona : कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात (Maharashtra Students In Kota) लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. त्यामुळे सध्या देशात सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार या विद्यार्थांना परत आणण्यासाठी 100 एसटी बस सोडणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Students In Kota) यांनी दिली.

राज्य सरकारने या विद्यार्थांसाठी परत येण्याची व्यवस्था केली असून तब्बल 100 एसटी बस लवकरच रवाना होणार आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी 100 एसटी बस सोडण्यात येणार असून एका एसटीमध्ये दोन चालक असणार आहेत. लांबचा प्रवास असल्याने एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीच्या काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आल्याने त्या चालकांच्या कुटुंबाने मात्र चिंता व्यक्त केली आहे. कोटा येथून या विद्यार्थ्यांना परच आणत आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, अशी देखील माहिती आहे (Maharashtra Students In Kota).

दरम्यान आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी सांगितले होते.

यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने हे विद्यार्थी येथे अडकून पडले. महाराष्ट्रात परत येण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चाही केली होती. त्यानंतर आता अखेर हे विद्यार्थी महाराष्ट्रात (Maharashtra Students In Kota) परत येणार आहेत.

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय : बांग्लादेशी तरुण उपचारासाठी पोहत पोहत आसाममध्ये

महाराष्ट्रात 522 नवे कोरोना रुग्ण, एकूण आकडा 8 हजार 590 वर

Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

Published On - 11:57 pm, Mon, 27 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI