पोलिसांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित, कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर जोरदार टीका केली आहे (Anil Deshmukh criticize Kangana Ranaut).

पोलिसांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित, कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 5:11 PM

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर जोरदार टीका केली आहे (Anil Deshmukh criticize Kangana Ranaut). कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. आपलं पोलीस दल सक्षम आहे. कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस दलाने कशाप्रकारे संक्रमण रोखण्यासाठी काम केलं. तुम्ही सर्वांनी हे पाहिलं आहे. हे काम करताना 165 पोलीस कर्मचारी शहीद झाले. अशावेळी एखादा फिल्मी कलाकार आमच्या पोलिसांविषयी अपमानास्पद वक्तव्य करत असेल तर आम्ही त्याचा धिक्कार करतो.”

हेही वाचा : फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“कायदा आणि सुव्यवस्थेबाबत संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या हातात सुरक्षित आहे. ते अशा प्रकारची वक्तव्यं करतात. तसेच मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरक्षित राहणं शक्य नसल्याचं बोलतात. त्यामुळे त्यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असंही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले, ““मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी.”

दुसरीकडे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या :

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

Anil Deshmukh criticize Kangana Ranaut

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.