AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train Update : कुठे झाड कोसळलं, तर कुठे रुळावर पाणी; मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

पावसामुळे रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Train Update : कुठे झाड कोसळलं, तर कुठे रुळावर पाणी; मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
मुंबई लोकल विस्कळीत
| Updated on: Jul 07, 2024 | 2:10 PM
Share

Maharashtra Local Train Update : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. ओव्हरहेड वायरवर झाडं कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे यामुळे कसाराहून सीएसटीकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

मुंबईसह कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे उंबरमाळी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर वशिंद स्टेशनजवळ ट्रॅकवर वाळू माती जमा झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

तर दुसरीकडे पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. तसेच अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना खाजगी वाहन करुन नाशिकपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. तसेच मुंबई ते नाशिक ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. सध्या इगतपुरी रेल्वे स्थानकातून डाऊन मार्गाची गोरखपूर एक्स्प्रेस ही पहिली गाडी नाशिक रोडच्या दिशेने रवाना झाली आहे.

स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी

तर मध्य रेल्वेची कसारा सीएसएमटी सेवा विस्कळीत झाली आहे. वाशिद, खडवली, आटगाव दरम्यान माती वाहून गेल्याने पोल वाकला आहे. त्यामुळे ओव्हरहेड वायरवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे स्टेशनच्या पुढे असेल्या ट्रकवर झाड कोसळले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा ते कसारा दरम्यान डाऊन मार्ग पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसामुळे रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

झाड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

ठाणे ते कसारादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळपासून शहापूर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसल्याचं दिसून येत आहे. आटगाव ते वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे. यामुळे ठाणे ते कसारा आणि कसारा ते ठाणे या ठिकाणी जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ओव्हरहेड वायरवर पडलेले झाड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबईतील कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातून येणाऱ्या अनेक गाड्या अडकल्याचे चित्र दिसत आहे. मँगलोर एक्सप्रेस ही गाडी कळंबोली या ठिकाणी अडकली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी हे गाडीतून उतरुन जाताना दिसत आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.