AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक…महायुतीवर लावला मोठा आरोप, म्हणाले याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत

Sanjay Raut on Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानानंतर राज्यात विविध संस्थांचे Exit Poll आले. त्यातील तिघांनीच महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. तर इतरांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली. तर आता महायुती अपक्षांना का चुचकारते आहे असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक...महायुतीवर लावला मोठा आरोप, म्हणाले याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत
संजय राऊत
| Updated on: Nov 22, 2024 | 10:45 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतदान केले. शहरी भागापेक्षा निमशहरी आणि आदिवासी बहुल भागात अधिक मतदान झाले. त्या पाठोपाठ आलेल्या विविध संस्थांच्या Exit Poll ने महायुतीच्या पारड्यात मतांचा कौल टाकला. या एक्झिट पोलचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. लोकसभेला आम्हाला केवळ 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालानंतर काय झालं? असा सवाल त्यांनी केला. तर जर बहुमताचा आकडा महायुतीकडे आहे तर मग ते अपक्षांना लोणी का लावत आहेत, असा रोकडा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. काय म्हणाले राऊत?

एक्झिट पोलची ऐशी की तैशी

समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. त्यांनी 40 जागा जिंकल्या. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला आम्हाला दहा पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला. आम्ही 31 जागा खेचून आणल्या. या सर्वेची ऐशी की तैशी असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतील सर्व जण एकत्र बसलो. महाराष्ट्राचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र आलो. प्रत्येक जागाचं गणित मांडलं. तेव्हा आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असं स्पष्ट झालं, असा दावा त्यांनी केला.

आम्ही जर 160 जागांवर जिंकत असू तर मग एक्झिट पोल कोणी केले. कुठल्या तरी कंपन्या येतात. काहीतरी एक्झिट पोल करतात. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांनी एक्झिट पोलचा अंदाज साफ नाकारला.

अपक्षांना पैशांची ऑफर

अनेक अपक्षांनी आमच्या बाजूने येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष यांचे उमेदवार निवडून येणार आहेत. ते महाविकास आघाडीचे घटक आहेत. तर काही इतर अपक्ष पण आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांन 50-50 कोटी आणि 100-100 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी यावेळी केला. या सर्व गोष्टींचा अर्थ आम्ही जिंकत असल्याचे संजय राऊत म्हणाले. सर्व्हेवाल्यांनी ही गोष्ट धान्यात घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.