दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेत कोणत्याही पदासाठी भरती नाही, सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा

बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरु असल्याबद्दल दिशाभूल करणारी व खोटी माहिती विविध समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेत कोणत्याही पदासाठी भरती नाही, सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा
‘दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 8:46 PM

मुंबई : ‘दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ द्वारे प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना बँकिंग सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे कर्मचारी सहकारी बँक गटातील आपल्या वर्गवारीत ही राज्यातील सर्वात मोठी कर्मचारी सहकारी बँक आहे. या बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरु असल्याबद्दल दिशाभूल करणारी व खोटी माहिती विविध समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या अनुषंगाने ‘दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ द्वारे बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सध्या सुरु नसल्याचे बँकेतर्फे कळविण्यात आले आहे. (message circulating on social media regarding recruitment in mumbai Municipal Cooperative Bank Ltd is false)

सोशल मीडियावर कोणता मेसेज फिरतो आहे ?

समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या खोट्या जाहिरातीमध्ये दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेमध्ये खुल्या प्रवर्गातील कॅशियर, शिपाई, शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक (आय.टी.), एएसटीटी, मॅनेजर (आय.टी.) आणि कार्यकारी सहाय्यक अशा विविध पदांकरीता भरती असल्याचे नमूद केले आहे.

सध्या फिरणारी जाहिरात दिशाभूल करणारी

मात्र, ही जाहिरात खोटी व दिशाभूल करणारी असून बँकेत भरती असल्यास बँकेच्या www.municipalbankmumbai.com या संकेतस्थळावर आणि अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात येते. मात्र, सध्या बँकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नसल्याचे बँकेद्वारे कळविण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण दि म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेने दिले आहे.

इतर बातम्या :

Breaking News | मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार, अदानी समूहाचं TV9 कडे स्पष्टीकरण

Scholarship Examination : 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

‘या’ कंपनीनं गुंतवणूकदारांचे भविष्यच बदलले, वर्षभरात 1 लाखांचे करून दिले 5 लाख

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.