AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, डेटा नष्ट करण्याची धमकी, राज्यात खळबळ

Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (MIDC Server Hack)

MIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, डेटा नष्ट करण्याची धमकी, राज्यात खळबळ
MIDC
| Updated on: Mar 30, 2021 | 6:46 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (Maharashtra Industrial Development Corporation) सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  एमआयडीसीचा सर्व्हर  हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल पाचशे कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सने Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (MIDC Server Hack)

हॅकर्सकडून डेटा नष्ट करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. Midc च्या अधिकृत मेल करत हॅकर्सने 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर ही मागणी पूर्ण केली नाही, तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील संपूर्ण महत्वाचा डेटा नष्ट करु, अशी धमकी देण्यात आली आहे.

संपूर्ण कामकाज ठप्प

एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली आहे.

हॅकर्सचा शोध सुरु

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक प्रकरणी सर्व डेटा रिस्टोर करावा. त्याशिवाय याबाबत सायबर सेलकडे तक्रार करावी, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरु करण्यात आली आहे. एमआयडीसी सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.

दरम्यान याआधीही गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. (MIDC Server Hack)

संबंधित बातम्या :

गेल्यावर्षी मुंबई अंधारात का गेली? कुणी घातली? कोडं उलगडलं, न्यूयॉर्क टाईम्सचं सविस्तर वृत्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.