MCA निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांची बाजी; अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे यांचे मानले आभार,चर्चांना उधाण
Milind Narvekar Wins MCA Elections : देशातील क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली. तर दिग्गजांचे आभार मानत असतानाच त्यांनी अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे यांचे आभार मानले.

देशातील क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी नशीब आजमावले. उद्धव ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी बाजी मारली. तर दिग्गजांचे आभार मानत असतानाच त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे आभार मानले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नार्वेकर यांनी निवडून आल्यावर त्यांच्या एक्स हँडलवर याविषयीची पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. त्यांच्या एक्स पोस्टची सध्या चर्चा आहे.
अमृता फडणवीस-रश्मी ठाकरेंचे आभार
MCA मध्ये निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी चक्क अमृता फडणवीस आणि रश्मी ठाकरे यांचे आभार मानले. सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानताना दोन्ही महिलांच्या नावाच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. MCA च्या कार्यकारणी सदस्यपदी निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सर्वच राजकीय नेत्यांचे आभार आभार मानले आहेत. X पोस्ट करत पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे नार्वेकर यांनी आभार मानले.
या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे नार्वेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांचे देखील नार्वेकर यांनी पोस्ट करत आभार मानले आहेत.
MCA ची नवीन कार्यकारणीत कोण?
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीकडे क्रिकेट जगाताचं नाही तर राजकीय नेत्यांचे पण लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांचे समंजस्य दिसून आले. एमसीएच्या निवडणुकीचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. त्यात अजिंक्य नाईक संघटनेचे अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदी निवड झाली. गेल्यावेळी नाईक हे अध्यक्षपदी होते. यावेळी ते बिनविरोध निवडून आले. तर आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा पराभव केला. मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी डॉ. उन्मेश खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे.
Honoured by the mandate and grateful for the trust reposed in me. 🙏🏼
My heartfelt thanks to @PawarSpeaks Saheb, Uddhav Thackeray Saheb (@OfficeofUT), CM @Dev_Fadnavis ji, @AUThackeray ji, DCMs @AjitPawarSpeaks ji & @mieknathshinde ji, and to @ShelarAshish ji, @praful_patel ji &… pic.twitter.com/zLnUJkmmaZ
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) November 12, 2025
अपेक्स कॉन्सिलपदी नार्वेकर
मिलिंद नार्वेकर हे अपेक्स कॉन्सिलच्या, कार्यकारणीच्या सदस्य पदासाठी इच्छुक होते. त्यांना या निवडणुकीत 241 मतं मिळाली. मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचले होते. त्यानंतर बुधवारी या निवडणुकीचा निकाल हाती आला. त्यात अनेकांनी धक्कादायक निकाल नोंदवले. MCA मध्ये निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी चक्क अमृता फडणवीस आणि रश्मी ठाकरे यांचे आभार मानले. सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानताना दोन्ही महिलांच्या नावाच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
