AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू : नवाब मलिक

जिथे भाजप सत्तेत आहे तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला (Minister Nawab Malik allegations that BJP hides death figures)

जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू : नवाब मलिक
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 11:46 PM
Share

मुंबई : “जिथे भाजप सत्तेत आहे तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. “पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाले”, असंही ते म्हणाले (Minister Nawab Malik allegations that BJP hides death figures).

‘आम्ही कुठलेही आकडे लपवले नाही’

“आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. दरदिवशी 70 हजार केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही, अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र आणि मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे”, असं नवाब मलिक म्हणाले (Minister Nawab Malik allegations that BJP hides death figures).

‘देशात 4 नाही तर 40 लाख मृत्यू’

“देशात 4 लाख लोकांच्या मृत्यूचा आकडा दिसत आहे. परंतु पत्रकार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा आकडा दहापट म्हणजे 40 लाखांच्या घरात जात आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

‘उत्तर प्रदेशात 5 ते 6 लाख कोरोनाबाधिंताचा मृत्यू’

“एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 5 ते 6 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत प्रवाहीत करण्यात आले. तर काही ठिकाणी नदीकिनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत”, असं नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्र्यांकडून कोकणाला 252 कोटींची मदत जाहीर, दुसरीकडे केंद्राच्या पथकाने जेवणावर ताव मारला’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.