अवाजवी बिलांच्या तक्रारीची दखल, मिरा रोडमधील हॉस्पिटलची ‘कोव्हिड’ मान्यता रद्द

मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी गॅलेक्सी रुग्णालयाची कोव्हिड मान्यता रद्द करत रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत.

अवाजवी बिलांच्या तक्रारीची दखल, मिरा रोडमधील हॉस्पिटलची 'कोव्हिड' मान्यता रद्द
अनिश बेंद्रे

|

Jul 28, 2020 | 7:59 AM

मिरा भाईंदर : कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारणी केल्याच्या तक्रारींची दखल घेत मिरा भाईंदर महापालिकेने गॅलेक्सी रुग्णालयाला दणका दिला आहे. मिरा रोड येथील गॅलेक्सी रुग्णालयाची Dedicated Covid Hospital (DCH) म्हणून दिलेली मान्यता मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने रद्द केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम या खाजगी रुग्णालयाकडून वसूल करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. (Mira Bhayandar Municipal Corporation Galaxy Hospital COVID recognition revoked)

मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील खाजगी हॉस्पिटल कोव्हिड-19 अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 80 टक्के बेड राखीव ठेवणे आणि शासनाने दिलेल्या दरानुसार कोव्हिड रुग्णांकडून बिल आकारणे आवश्यक आहे. मात्र शासनाच्या आदेशाचे पालन न करता अवाजवी देयके आकारत असल्याबाबत तक्रारी गॅलेक्सी रुग्णालयाविरुद्ध प्राप्त होत आहेत.

हेही वाचा : पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप

महापालिका प्रशासनाने खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून रुग्णालयास शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कामकाज न केल्याबाबत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र गॅलेक्सी रुग्णालयाकडून कोणताही खुलासा प्राप्त झाला नाही. तसेच लेखापरीक्षणाअंती ज्यादा आकारणी केलेल्या रकमा संबंधित रुग्णांना परत केल्याचे कोणतेही पुरावे सादर केलेले नाही. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी रुग्णालयाची कोव्हिड मान्यता रद्द केली. त्याचप्रमाणे रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत.

बेड्सची माहिती ऑनलाईन मिळणार

मिरा भाईंदर क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे या हेतूने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयातील 80% बेड कोव्हिड19 साठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत.

हेही वाचा : बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्णाचा हॉस्पिटलमधूनच पळ

मिरा भाईंदर शहरातील कोरोनाबाधित रुग्ण व संशयितांना उपचार घेण्यासाठी कोणत्या खाजगी/पालिका रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, याबाबत ऑनलाईन माहिती उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने www.covidbedmbmc.in संकेतस्थळ विकसित केले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मिरा भाईंदर शहरातील रुग्ण आणि नागरिकांना महापालिकेने नेमून दिलेली रुग्णालये आणि पालिका रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या आणि त्यापैकी किती बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत, किती रिक्त आहेत, आयसीयू आणि नॉन आयसीयूमध्ये किती उपलब्ध आहेत, याची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

खाजगी आणि मनपा रुग्णालयात www.covidbedmbmc.in या संकेतस्थळावर जाऊन बेड आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. रिक्त बेड, रुग्णवाहिका व शववाहिनीचे बुकिंग 022-28141516 या दूरध्वनीवरुनही करण्याची सुविधा (24X7) महानगरपालिकेने मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. (Mira Bhayandar Municipal Corporation Galaxy Hospital COVID recognition revoked)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें