‘आपला भिडू, बच्चू कडू’, ओल्या दुष्काळासाठी मोर्चा, बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (MLA BACCHU KADU Morcha) यांनी आज मुंबईत मोर्चा काढून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

'आपला भिडू, बच्चू कडू', ओल्या दुष्काळासाठी मोर्चा, बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu Morcha for wet drought) यांनी आज मुंबईत मोर्चा काढून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. मुंबईत राजभवनाच्या दिशेने जाणारा हा  मोर्चा (MLA Bacchu Kadu Morcha for wet drought) पोलिसांनी अडवला. शिवाय पोलिसांनी बच्चू कडू यांनाही ताब्यात घेतलं. बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत, पोलिसांची गाडी अडवली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना त्वरीत मदक करावी, तसेच पीक विम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आपला भिडू बच्चू कडू, अशा घोषणा देत, आंदोलक शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू पुढे सरसावले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी त्यांनी मोर्चा काढला. राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने परिसराला पोलीस छावणीचं रुप आलं आहे.  या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI