Tv9 Special Report | मनसे आणि भाजप युतीतली आतली बातमी, पडद्यामागे जोरदार हालचाली

भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु झालीय. मुंबईतली लोकसभेची एक जागा देऊन मनसेला सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. मनसेसंदर्भात पडद्याआड काय घडतंय? याबाबत माहिती सांगणारा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!

Tv9 Special Report | मनसे आणि भाजप युतीतली आतली बातमी, पडद्यामागे जोरदार हालचाली
devendra fadnavis and raj thackeray
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 10:35 PM

मुंबई | 14 मार्च 2024 : भाजप आणि मनसेत युतीसाठी पुन्हा दिल्लीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु झाल्याचं कळतंय. लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरु झालीय. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार आहे. मात्र भाजपच्या कमळ चिन्हावर मनसेच्या उमेदवारानं लढावं, असा आग्रह भाजपचा असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप-मनसेचं ठरल्यास दक्षिण मुंबईतून मनसेच्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळू शकते. युतीची चर्चा सुरु असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनीही स्पष्ट केलंय. भाजपच्या पहिल्या यादीत 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यात उत्तर मुंबईतून पियूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलीय. उत्तर पश्चिम मुंबईतून विद्यमान खासदार गजानन किर्तीकर असून ठाण्याच्या बदल्यात भाजपनं ही जागा आपल्या वाट्याला घेतल्याची सूत्रांची माहिती आहे आणि भाजप इथून अमित साटम यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य मुंबई ही जागा भाजपचीच असून पूनम महाजन खासदार आहेत. मात्र यावेळी आशिष शेलारांचं नाव चर्चेत आहे. दक्षिण मध्य मुंबई ही जागा शिंदेंच्या शिवसेनेची असून राहुल शेवाळे खासदार आहेत. पुन्हा शेवाळेंनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि दक्षिण मुंबईतून सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. या जागेवरुन भाजप आणि मनसेत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

मनसे-भाजप युतीमागील समीकरण काय?

आता मुंबईतली दक्षिण मुंबईची जागा देवून मनसेसोबतच भाजप युती का करु शकते? तेही समीकरण समजून घेवूया. मुंबईतली उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी करण्यासाठी युती होऊ शकते. गेल्या 9 दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय. मात्र उर्वरित मतदारसंघातले दौरे राज ठाकरेंनी अचानक रद्द केले. त्यामुळं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांचा चांगला होल्ड आहे. शिवसेनेच्या फुटीमुळं मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळं नांदगावकर विजयी होतील, असं भाजपला वाटतंय. मनसे महायुतीत आल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजपसोबत मनसेलाही फायदा होईल.

एकनाथ शिंदे गटाची भूमिका काय?

विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत भाजपच्या राहुल नार्वेकरांचं नाव आतापर्यंत चर्चेत होतं. नार्वेकरांचे दौरेही सुरु झाले. मात्र धक्कातंत्रात भाजप माहीर आहे. त्यामुळं भविष्यातील समीकरण जुळवण्यासाठी महायुतीत आणखी एक मित्रपक्ष मनसेच्या रुपात येवू शकतो. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेची आहे. मग अचानक मनसेची एंट्री कशी? असं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणतायत.

राज ठाकरेंचे ‘ते’ संकेत खरे ठरणार?

भाजप आणि मनसेत युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भाजपच्या एकाही नेत्याकडून खंडन करण्यात आलेलं नाही. याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर योग्य वेळी निर्णय होईल, असं म्हटलंय. 18 वर्षांत मनसेनं कोणाशीही युती किंवा आघाडी केलेली नाही. मात्र गेल्या वर्षीच राज ठाकरेंनी आपण सत्तेपासून दूर नसणार, मनसे सत्तेत असेल असा विश्वास राज ठाकरेंनीही व्यक्त केला होता. आता मनसे आणि भाजपमध्ये चर्चा सुरु झालीय, भाजपचे नेतेही ते मान्यही करतायत. त्यामुळे काही दिवसांतच अधिक स्पष्टता येईल.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.